Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

धक्कादायक! पक्षातील कार्यकर्त्यांशीच अनैसर्गिक संबध ठेवल्याप्रकरणी आमदाराला अटक...

धक्कादायक! पक्षातील कार्यकर्त्यांशीच अनैसर्गिक संबध  ठेवल्याप्रकरणी आमदाराला अटक...


देशाचे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांना पुन्हा मोठा धक्का बसला आहे. त्यांचे पुत्र एच. डी. रेवण्णा यांच्या दुसऱ्या आमदार मुलालाही कर्नाटक पोलिसांनी रविवारी अटक केली. काही दिवसांपुर्वीच रेवण्णा व त्यांच्या प्रत्नीसह प्रज्वल रेवण्णाला सेक्स स्कँडलप्रकरणी अटक झाली होती.
प्रज्वलचा मोठा भाऊ सूरज याला जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाच्या एका कार्यकर्त्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक केली आहे. त्यामुळे सध्या दोघेही तुरुंगात आहे. माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी काही दिवसांपुर्वीच केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर सूरजला अटक झाल्याने राज्यात खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण?

सूरज रेवण्णा हा विधानपरिषदेचा आमदार आहे. त्याच्याविरोधात एका तरुणाने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, सुरजने त्याला १६ जूनला हसन जिल्ह्यातील फार्महाऊसवर बोलवले होते. तिथे सुरजने जबरदस्तीने ओठांचे चुंबन घेतले. तसेच अनैसर्गिक लैंगिक संबंधही ठेवल्याचे आरोप तक्रारदार तरुणाने केले आहे. त्यानुसार सुरजवर शनिवारी भारतीय दंड संहितेतील कलम 377 आणि कलम 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास आता सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे.

दरम्यान, सूरज आणि त्याचा सहकारी शिवकुमार यांनीही संबंधित तरुणाविरोधात पोलिसांत तक्रार दिली आहे. लैंगिक छळाची खोटी तक्रार दाखल करण्याची धमकी दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आर्थिक स्थिती चांगली नसल्याने नोकरीसाठी मदत करण्याची विनंदी संबंधित व्यक्तीने केली होती. लोकसभा निवडणुकीनंतर सुरजशी भेट घडवून आणण्याचे त्याला सांगितले होते, असे शिवकुमारने तक्रारीत म्हटले आहे.

कुटुंबच गोत्यात
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाचा प्रज्वलचे सेक्स स्कँडल बाहेर आले. त्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाले. एका महिलेल्या तक्रारीवर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर मतदानानंतर दुसऱ्या दिवशी प्रज्वल परदेशात पळून गेला. काही दिवसांपुर्वीच तो राज्यात परतला. त्याला लगेच पोलिसांनी अटक केली.

प्रज्वलची आई आणि वडिलांना अपहरणाच्या केसमध्ये अटक करण्यात आली होती. दोघेही सध्या जामीनावर तुरुंगातून बाहेर आहेत. आता सूरजलाही लैंगिक छळाच्या प्रकरणात अटक करण्यात आल्याने कर्नाटकात खळबळ उडाली आहे. सुरज हा डॉक्टर आहे. देवेगौडा यांचा मुलगा, सून आणि दोन नातूंना जेलची हवा खावी लागल्याने राजकारण तापलं आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.