Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जिल्हा परिषद शाळेत मंत्रिमंडळ निवडणुकीत हाणामारी, विद्यार्थ्यांनी एकमेकांची डोकीच फोडली

जिल्हा परिषद शाळेत मंत्रिमंडळ निवडणुकीत हाणामारी, विद्यार्थ्यांनी एकमेकांची डोकीच फोडली

जिल्हा परिषदेच्या शाळेत शालेय मंत्रिमंडळ निवडणुकीत हाणामारी झाली असून एकमेकांची डोकी फोडण्यापर्यंत प्रकार वाढला. पुण्याच्या खेड तालुक्यातल्या पापळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. शुक्रवारी घटलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ माजली आहे.

शाळेतील विद्यार्थ्यांना लोकशाहीचे महत्त्व कळावे, त्यांना लोकशाही मार्गाने होणारी निवडणूक प्रक्रिया अवगत व्हावी, याकरिता प्राथमिक शाळेत शालेय उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचे मंत्रिमंडळ निवडणुकीचा उपक्रम राबवला जातो. या उपक्रमांतर्गत प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांमधून मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, आरोग्यमंत्री, क्रीडामंत्री, शिस्तमंत्री अशा पदांची निवड निवडणुकीच्या माध्यमातून पार पाडली जाते. शाळेचे कामकाज सुरळीत व्हावे, विद्यार्थ्यांना शिस्त लागावी हा या उपक्रमा मागचा उद्देश आहे.

पापळवाडी येथील शाळेची पटसंख्या चाळीस आहे. तेथे शुक्रवारी निवडणुकीचा हा उपक्रम राबवण्यात आला. ही निवडणूक होणार असल्याची सूचना शिक्षकांनी आदल्या दिवशी विद्यार्थ्यांना दिली. मुख्यमंत्रिपद आपल्याच गटाला मिळावे, यासाठी विद्यार्थ्यांसोबत विद्यार्थिनीसुद्धा आक्रमक झाल्या होत्या. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काहींनी एक-दोन रुपयांचे आर्थिक आमिषसुद्धा दाखवल्याची चर्चा ऐकू आली.

अखेर ठरलेल्या दिवशी निवडणूक प्रक्रिया पार पडली. मुख्यमंत्री म्हणून मुलीची निवड झाली. त्यादिवशी सायंकाळी शाळा सुटली अन् निवडणुकीवरून विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या गटामध्ये रस्त्यातच हाणामारी झाली. विद्यार्थ्यांनी एकमेकांना चपलेने मारले तर काहींनी दगडही फेकून मारले. यामध्ये काही विद्यार्थिनींचे डोके फुटले, तर काहींच्या हाताला मार लागला. घडलेल्या या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त करण्यासाठी काही पालक दुसऱ्या दिवशी शाळेत गेले.आणि शिक्षकांकडे या घटनेची तक्रार केली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.