Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पोट सुटलंय की शर्टाची बटणं बसेनात? फक्त 'हे ' करा तांदळाचं पाणी प्यायला सुरवात करा!

पोट सुटलंय की शर्टाची बटणं बसेनात? फक्त 'हे ' करा तांदळाचं पाणी प्यायला सुरवात करा!


परवा दिवशी ऑफिसला जायच्या घाईत मनिषच्या शर्टच एक बटण बसत नव्हतं. अन् खूप ओढातान झाल्याने ते तुटलं. त्याने रागानेच हाताची बटणं काढली शर्ट उटला काढून बेडवर फेकला.

अन् सरळ टी-शर्ट अडकवून निघून गेला.

सिमाला आजही त्यांचा बेडवर पडलेला शर्ट उचलून त्याचं बटण लावायचं होतं. रोजचं होतं असं. ऑफिसमधील काम आणि रात्रीच जागरण यामुळे मनिषचं वजन वाढतच चाललं आहे. त्याच्या पोटची ढेरी वाढलीय. आणि या तुटलेल्या बटनांची तिला आता सवय झालीय त्याची. पण, तुम्ही अशी सवय लावून घेऊ नका. 

वाढलेली कंबर,ढेरी कमी करण्यासाठी लोक जेव्हा उपाय शोधतात. तेव्हा पहिला उपाय असतो चहा बंद करा अन् त्याजागी डिटॉक्स वॉटर प्यायला सुरूवात करा. पण सकाळची सुरूवात कोमट लिंबू पाण्याने करणे जिवावर येते. त्यामुळेच वजन कमी करण्याकडे दुर्लक्ष होते.
पण आज आम्ही तुम्हाला असा उपाय सांगणार आहोत. जो केल्याने दिवसाची सुरूवातही चांगली होईल. अन् तुमची वाढलेली ढेरीही कमी होईल. त्यासाठी काहीही जाद्याचे काम करण्याची गरज नाही. फक्त सकाळी उठल्यावर तांदळाचे पाणी प्या. वजन कमी करण्यासाठी भातापासून दूर राहण्यास सांगितले जाते. भात खाणे बंद करा, त्याने कॅलरी वाढतात असे डायटिशियन्स सांगतात. 

आयुर्वेदिक डॉक्टर दीक्षा भावसार यांच्या मते, तांदळाच्या पाण्यात भरपूर प्रमाणात स्टार्च आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे आपल्या शरीरासाठी खूप चांगले असतात. वजन कमी करण्यासाठी तांदळाचे पाणी हा अतिशय सोपा आणि स्वस्त उपाय आहे. यामुळे शरीरातील कॅलरीजची पातळी कमी होते. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
तांदळाचे पाणी पिण्याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. शरीरातील चरबी कमी करण्यासाठी हे फायदेशीर आहे. मात्र, यासोबतच नियमित योगा, कार्डिओ आणि सकस आहाराचाही समावेश करावा लागेल. तुम्ही ते एनर्जी ड्रिंक म्हणूनही पिऊ शकता. एवढेच नाही तर तांदळाचे पाणी केसांना सुंदर आणि मजबूत बनवते. त्याचे पाणी जपान आणि इतर देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जाते.

शरीराला होतात इतर फायदे
तांदळाचे पाणी पिल्याने शरीरातील अनेक समस्या दूर होतात, लघवी करताना होणारी जळजळ, जुलाब आणि मासिक पाळीच्या समस्यांपासून आराम मिळतो. याशिवाय ज्या महिलांच्या शरीरावरून पांढऱ्या रंगाचा स्त्राव जातो. त्याला लिकोरिया म्हणतात. या समस्याही कमी होतात.

तांदळाच्या पाण्यात भरपूर खनिजे आणि जीवनसत्त्वे असतात. त्यात 'इनोसिटॉल' नावाचे संयुग असते जे तुमच्या खराब झालेल्या पेशी काढून टाकते आणि नवीन तयार करते. तांदळाच्या पाण्यात अँटिऑक्सिडेंट, मॉइश्चरायझिंग आणि यूव्ही किरण शोषणारे गुणधर्म देखील असतात जे चेहऱ्यावरील ओपन पोर्सना बंद करते. त्याचा आपल्या उजळ त्वचेला फायदा होतो.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.