Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

तुम्हालाही असेल लघवी थाबंवून ठेवा यची सवय तर आजच सोडा! नाहीतर फाटू शकत मुत्राशय

तुम्हालाही असेल लघवी थाबंवून ठेवा यची सवय तर आजच सोडा! नाहीतर फाटू शकते मुत्राशय 


आजकालच्या धावपळीच्या जीवनात आपल्याकडे वेळेवर जेवायलाही वेळ नसतो, त्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. रोजच्या रोज पोट साफ न होणं पुढे त्रासदायक ठरू शकतं. त्याचप्रमाणे लघवी थांबवून ठेवल्यानंही आरोग्याचं नुकसान होतं. बऱ्याचदा प्रवासात आपण असं करतो. याचे गंभीर दुष्परिणाम पुढे सहन करावे लागू शकतात. नेमकं काय नुकसान होतं जाणून घेऊया.

डॉ. अनुपम किशोर सांगतात की, एकदा लघवी थांबवून ठेवली की, पुढे हे आपल्या सवयीचं होतं. ही सवय सर्वांसाठीच नुकसानकारक असते. परंतु पुरुषांपेक्षा महिलांना जास्त घातक ठरू शकते. आपल्या या सवयीमुळे किडनी स्टोनसारखे लघवीसंबंधित आजार उद्भवू शकतात.

महिलांनी जास्त वेळ लघवी थांबवून ठेवल्यास मूत्राशयावर ताण येतो. जर लघवीला जाण्याची काहीच सुविधा नसेल तर आपण जास्तीत जास्त अर्धा तास लघवी थांबवून ठेवू शकता, त्यापेक्षा जास्त वेळ लघवी रोखून धरली आणि आपलं मूत्राशय कमकुवत असेल तर ते फाटू शकतं. मग त्यानंतर आयुष्यभराचं दुखणं घेऊन बसण्याव्यतिरिक्त काही पर्याय उरणार नाही. तर, पुरुषांनी जास्त वेळ लघवी थांबवून ठेवल्यास त्यांना युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. पुरुषांच्या तुलनेत महिलांना किडनी स्टोन होण्याची शक्यता अधिक असते. शिवाय लघवीच्या जागी दुखू शकतं, खाज येऊ शकते. त्यामुळे वेळच्या वेळी लघवी करावी.

सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी, आपण आपल्या आरोग्यासंबंधित कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज 'सांगली दर्पण' जबाबदार नसेल.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.