Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या घरावर बुलडोझर

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या घरावर बुलडोझर 


हैदराबाद : महानगरपालिकेने शनिवारी आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांच्या लोटस पॉन्ड निवासस्थानाशेजारील फूटपाथवरील बेकायदा बांधकाम पाडले.

रेड्डी यांनी आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर 10 दिवसांनी ही कारवाई करण्यात आली आहे. जीएचएमसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी जगन यांच्या घरासमोरील फूटपाथवरील कंपाउंड वॉलला लागून असलेले बेकायदा बांधकाम पाडले.

या बेकायदा बांधकामांचा वापर सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून होत असल्याचे त्यांनी सांगितले. जीएचएमसीच्या नगर नियोजन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, बेकायदेशीर बांधकाम हटवण्यासाठी त्यांनी जगनच्या निवासस्थानी संबंधितांना फूटपाथच्या बांधकामासाठी सहा महिने अगोदर कळवले होते.

अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, 'आम्ही त्यांना फूटपाथच्या बांधकामासाठी बेकायदेशीर बांधकाम हटवण्यास सांगितले आहे. फुटपाथवर अतिक्रमण झाल्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्यांची गैरसोय होत असल्याच्या तक्रारी वसाहतीतील रहिवाशांनी केल्या आहेत. वायएसआर काँग्रेस पक्षाच्या सूत्रांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, ही बांधकामे पाऊस आणि उन्हाळ्यात सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी करण्यात आली आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.