Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

चकूनही 'या ' लोकांनी संध्याकाळी चहा पिऊ नये, अन्यथा.......

चकूनही 'या ' लोकांनी संध्याकाळी चहा पिऊ नये, अन्यथा.......


चहाला वेळ नसते पण वेळेला चहा पाहिजे, असे म्हंटले जाते. सुमारे 64% भारतीय लोकसंख्येला दररोज चहा प्यायला आवडतो. चहा पिल्याशिवाय दिवसाची सुरुवात करणेही काहींना अवघड जाते, तर काही लोक दिवसाच्या कोणत्याही वेळी चहा पितात, परंतु सामान्यतः लोक दिवसातून दोनदा चहा पितात, 

सकाळी आणि संध्याकाळी.

सकाळी चहा पिणे त्यातल्या त्यात योग्य जरी असले तरी संध्याकाळी काही लोकांसाठी चहा हा हानिकारक ठरू शकतो.

बहुतांश लोकं दिवसभरात दोनदा चहा पितात. सकळचा चहा हा रिकाम्या पोटी घेऊ नका असे तज्ञ सांगतात, मात्र संध्याकाळचा चहा काही लोकांनी टाळायला हवा असेही सांगितले जाते. तर मग कोणत्या लोकांनी संध्याकाळी चहा पिणे टाळायला हवे ते माहिती करून घ्या.

चहा ही एक अशी गोष्ट आहे जी प्यायल्याने व्यक्तीला फ्रेश आणि ऊर्जावान वाटते. त्यामुळे अनेक नोकरदार वर्ग संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर चहाच्या टपरीवर गर्दी करतात. घरात देखील संध्याकाळी 4 ते 7 दरम्यान चहा पीला जातो. दिवसभराचा ताण आणि थकवा दूर करण्यासाठी तो लोकांना गरजेचा वाटतो. पण संध्याकाळचा हा चहा काही लोकाना खूप त्रासदायक ठरू शकतो.

संध्याकाळी चहा पिणे कोणी टाळावे?
झोपेची समस्या असलेली लोकं: ज्या लोकांना झोप कमी आहे किंवा निद्रानाशाचा त्रास होतो त्यांनी संध्याकाळचा चहा पिणे टाळायला हवे.
चिंतग्रस्त असलेली लोकं: जे नेहमी चिंताग्रस्त असतात आणि तणावपूर्ण जीवन जगतात त्यांनी देखील चहा पिणे टाळावे, कारण त्यामुळे रात्रीच्या झोपेत व्यत्यय निर्माण होऊ शकतो, परिणामी तणाव आणखीन वाढू शकतो.
वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असलेली: ज्या लोकांना आपले वजन कमी करायचे असेल तर त्यांनी संध्याकाळचा चहा पिणे बंद करावा, ज्यामुळे शरीरात अतिरिक्त केलरी जाणार नाही. आणि काही दिवसातच फरक दिसून येईल
अनियमित आहार घेणारे: जी लोकं कधीही जेवतात, त्यांची जेवणाची वेळ नियोजित नसते, अशा लोकांनी संध्याकाळचा चहा वर्ज्य करावा. कारण चहामुळे गॅस, आणि पोटाच्या समस्या त्यांना उद्भवू शकतात.
हार्मोनलच्या समस्या असणारे: ज्यांना हार्मोनलच्या समस्या होतात, तसेच ज्यांना अॅसिडिटीचा त्रास होतो, अशा लोकांनी संध्याकाळी चहा अजिबात पिऊ नये.
इतकेच नव्हे तर, वातदोष, बद्धकोष्ठता, गॅस, चयापचय आणि कोरडे केस व त्वचेच्या समस्या असलेल्या लोकांनी संध्याकाळचा चहा पिणे शक्यतो टाळणेच योग्य ठरेल.
आजाराने त्रस्त: मेटाबॉलिक आणि ऑटोइन्यून यांसारख्या आजारने त्रस्त असलेल्या लोकांनी चहा सोडून दिलेला बरा..
संध्याकाळी चहा कोण पिऊ शकतो?

जे लोक रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करतात
ज्यांना ॲसिडिटी किंवा गॅस्ट्रिकचा त्रास होत नाही
ज्यांची पचनशक्ती निरोगी आहे.
जो अर्धा किंवा 1 कप पेक्षा कमी चहा पितो.
अशी लोकं संध्याकाळी चहा पिऊ शकतात.

(अस्वीकरण: संबंधित लेख वाचकांची माहिती आणि जागरूकता वाढवण्यासाठी लिहिण्यात आला आहे. ' सांगली दर्पण ' या लेखात दिलेल्या माहितीबाबत कोणताही दावा करत नाही किंवा कोणतीही जबाबदारी घेत नाही. वरील लेखात नमूद केलेल्या संबंधित रोगाबद्दल अधिक तपशीलांसाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.