Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली :- जतमध्ये जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गभींर

सांगली :- जतमध्ये जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गभींर 


जत: सांगलीतील जत तालुक्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यासोबतच जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे तालुक्यात चारा छावण्यांसह टँकरची संख्या वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे.
परंतु, असं जरी असलं तरीही आचारसंहितेमुळे मात्र राज्य सरकारला यावर तोडगा काढणं कठीण जात आहे. सरकारने राज्य निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता शिथिल करण्याची मागणी केली होती, मात्र ती आयोगाने फेटाळल्याने आता दुष्काळग्रस्त भागांना मदत जाहीर करणं सरकारला शक्य नाही. त्यामुळे आता यावर मार्ग निघत नसल्याचंच चित्र आहे. 

जत तालुक्यात दुष्काळाची तीव्रता आणि दाहकता अधिकच वाढत चालली आहे. जत तालुक्यातील पूर्व भागातील 73 गावांच्या 533 वाड्या-वस्त्यांवर 97 टँकरनं सध्या माणसांना आणि जनावरांना पाणीपुरवठा केला जात आहे. पण चाऱ्याच्या तुटवड्यामुळे चारा छावणीची मागणी वाढू लागली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे चारा छावणी आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याच्या टँकरची संख्या वाढवण्याचा प्रस्ताव मंजूर होत नसल्याचं जतचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी म्हटलं आहे. तर जत तालुक्यातील पूर्व भागांतील काही भागांत चारा छावणी किंवा चारा डेपो सुरू करण्याबाबत मागणी अर्ज आलेले आहेत. या अर्जाच्या संदर्भात अहवाल एक दोन दिवसांमध्ये शासनाला पाठवला जाणार असल्याचं, अधिकाऱ्यांकडून सांगितलं जात आहे.

भीषण दुष्काळाचा मुक्या जनावरांनाही फटका

सध्या मराठवाड्याला भयाण दुष्काळाचा फटका बसत आहे. अशातच छत्रपती संभाजीनगरमध्ये चाऱ्या अभावी गोशाळा कशा चालवायच्या? हा प्रश्न गोशाळा चालकांना पडला आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील पारुंडी गावातील पारसनाथ गोशाळा चालकांनी आपले घरातील दागिने गहाण ठेवून चारा खरेदी केला आहे. तसंच, आता केवळ दोन दिवस पुरेल इतकाच चारा शिल्लक असल्यानं त्यांनी गोशाळाला चारा देण्याचं आवाहन केलं आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.