Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पंचक असो अथवा नसो, अंत्यविधीला गेल्यावर 'या ' चुका कधी करू नका

पंचक असो अथवा नसो, अंत्यविधीला गेल्यावर 'या ' चुका कधी करू नका 


जो कोणी या पृथ्वीतलावर जन्माला येईल, त्याचा मृत्यू निश्चित आहे आणि यालाच जीवनाचे अंतिम सत्य मानले जाते. मृत्यूनंतर मानवी आत्मा परमात्म्यामध्ये विलीन होतो, असे मानले जाते. पण, तरीही मृत्यूनंतर अनेक विधी केले जातात.

हिंदू धर्मात एकूण 16 संस्कारांचे वर्णन आहे, त्यापैकी 16 वा हा अंत्यसंस्कार आहे. या विधींचे अनेक नियम आहेत, जे प्रत्येकाने पाळले पाहिजेत, असे सांगितले जाते. अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत जाणारे लोक अज्ञानामुळे काही चुकीच्या गोष्टी करतात. यातील महत्त्वाची बाब म्हणजे अंत्यसंस्कारानंतर परत येताना स्मशानभूमीकडे मागे वळून पाहायचे नसते. गरुड पुराणात याचा उल्लेख आहे. याविषयी ज्योतिषी पंडित योगेश चौरे यांच्याकडून अधिक जाणून घेऊ.
आत्म्याचं अस्तित्व असतं -

गरुड पुराणानुसार, मृत्यूनंतर आत्मा शरीर सोडून जातो. अंत्यसंस्कारानंतर देह जाळला जातो, पण आत्मा काही काळ तिथेच राहतो. भगवान श्रीकृष्णाने गीतेत म्हटले आहे की, आत्मा अमर, शाश्वत आणि अविनाशी आहे. कोणतेही शस्त्र आत्म्याला मारू शकत नाही, अग्नी त्याला जाळू शकत नाही आणि पाणी त्याला बुडवू शकत नाही.

कुटुंबियांचा मोह उरतो -
एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो, तेव्हा त्याला अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीत नेले जाते. असे म्हणतात की, या संस्कारानंतर आत्मा दुसऱ्या जगात जात असतो. परंतु, जेव्हा कुटुंबातील लोक अंत्यसंस्कारानंतर मागे वळून पाहतात तेव्हा मृताच्या आत्म्याची कुटुंबाप्रती असलेली ओढ त्याला दुसऱ्या जगात जाण्यापासून रोखते. तथापि, मृत व्यक्तीच्या आत्म्याच्या शांतीसाठी 13 दिवस अनेक विधी केले जातात.
आत्म्याचा मोह -

गरुड पुराणात असे सांगितले आहे की, मृत्यूनंतर आत्मा त्याच्या अंत्यसंस्काराचे सर्व विधी पाहतो. स्मशानभूमीत मृत व्यक्तीचे नातेवाईक उपस्थित असल्याने त्याला त्यांच्याविषयी ओढ असते. त्यामुळे अंत्यसंस्कानंतर आपण मागे वळून पाहतो, तेव्हा तो तुमच्याकडे आकर्षित होतो आणि तुमचे त्याच्याशी असलेले नाते तुटू शकत नाही. अशा स्थितीत आत्म्याला परलोकात जाण्यात अडचण येते, म्हणून अंत्यसंस्कारानंतर मागे वळून पाहू नये, असे सांगितले जाते.

(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सांगली दर्पण त्याची हमी देत नाही.)

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.