Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

' भाजपाला आता पाठींबा नाही '

' भाजपाला आता पाठींबा नाही '


ओडिशामध्ये लोकसभा आणि विधानसभा दोन्ही निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने दणदणीत विजय नोंदवला आहे. भाजपने बहुमताने राज्यात सरकार स्थापन केले आणि राज्याचे दीर्घकाळ मुख्यमंत्री असलेले बिजू जनता दल (बीजेडी) अध्यक्ष नवीन पटनायक यांची हकालपट्टी केली.
संसदेत बहुतांश मुद्द्यांवर बीजेडी भाजपसोबत होती. मात्र, आता निवडणूक निकालानंतर बीजेडीने आता भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारविरोधात संसदेत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन पटनायक यांनी आपल्या राज्यसभा खासदारांना याबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.
नवीन पटनायक यांच्या विशेष सूचना
नवीन पटनायक यांनी सोमवारी पक्षाच्या नऊ राज्यसभा सदस्यांची बैठक घेतली. 27 जूनपासून सुरू होणाऱ्या राज्यसभेच्या अधिवेशनात त्यांनी खासदारांना सक्रिय आणि मजबूत विरोधी पक्षाची भूमिका बजावण्याचे निर्देश दिले आहेत. पटनायक यांनी खासदारांना राज्याच्या हिताशी संबंधित मुद्दे संसदेत योग्य पद्धतीने मांडण्यास सांगितले आहे.
काय झालं बैठकीत?

राज्यसभेतील बीजेडी नेते सस्मित पात्रा म्हणाले की, यावेळी संसदेत बिजू जनता दलाचे खासदार केवळ विविध मुद्द्यांवर बोलण्यापुरते मर्यादित राहणार नाहीत. केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने ओडिशाच्या हिताकडे दुर्लक्ष केल्यास ते आंदोलन करण्यासही तयार असल्याचे ते म्हणाले. ते म्हणाले की, खासदार राज्यातील खराब मोबाइल कनेक्टिव्हिटी आणि बँक शाखांची संख्या कमी असल्याचा मुद्दा देखील उपस्थित करतील.

आता भाजपला पाठिंबा नाही
सस्मित पात्रा म्हणाले की, नऊ खासदार राज्यसभेत प्रबळ विरोधी पक्ष म्हणून काम करतील. आता भाजपला पाठिंबा देणार नसून केवळ विरोधी पक्षाची भूमिका बजावणार असल्याचे त्यांनी सांगितले. ओडिशाच्या हिताच्या रक्षणासाठी आम्ही कोणत्याही थराला जाऊ शकतो. ते पुढे म्हणाले की, भाजपला पाठिंबा देण्याचा प्रश्नच येत नाही.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.