Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

संविधानाच्या विषयावर असीम सरोदे यांचं मोठ वक्तव्य

संविधानाच्या विषयावर असीम सरोदे यांचं मोठ वक्तव्य

“पक्षांतर बंदी कायदा हा राजीव गांधींनी आणला. हा कायदा पक्षांतर होऊ नये म्हणून आणला आहे. ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांनी पक्षांतर केले, मग देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की मीच ते घडवून आणले. एका मुलाखतीत सांगितले की गेलो आणि येईन येईन म्हणून दोन पक्ष फोडून आलो. राष्ट्रवादी पण फोडली. सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये असंवैधानिक काम, बेकायदेशीर रित्या राजकारण करून जर कोणी केलं असेल तर देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे” असा आरोप असीम सरोदे यांनी केला.

“महाराष्ट्र धर्म सांगतो की, आम्हाला अशी फोडाफोडी मान्य नाही. त्यामुळे महाराष्ट्रात सध्या सगळ्यात जास्त कुरूप चेहरा म्हणून देवेंद्र फडणवीस आहे. भारतामध्ये नरेंद्र मोदींची लाट आहे, पण महाराष्ट्रामध्ये दोन लाटा होत्या, नरेंद्र मोदी विरोधी लाट आणि देवेंद्र फडणवीस विरोधी लाट” अशी टीका असीम सरोदे यांनी केली.

‘राहुल नार्वेकर याना प्रश्न विचारला पाहिजे’

“राहुल नार्वेकर यांनी सांगितले की, कोणीही अपात्र नाही. हा पक्षांतर बंदीचा वाद नाही, पक्षातंर्गत वाद आहे. आपण नागरिक म्हणून राहुल नार्वेकर याना प्रश्न विचारला पाहिजे कि, संविधानची शपथ घेऊन सांगा, जर शेड्युल 6 नुसार हा विषय तुम्ही हाताळू शकत नाही, तर मग, त्यांनी एक पत्र सर्वोच्च न्यायालयाला द्यायचे होते. हे विषय हाताळू शकत नाही” अशी टीका असीम सरोदे यांनी केली.

‘बेकायदेशीर सरकार आमच्या बोकांडीवर मारले’

“बेकायदेशीर सरकार आमच्या बोकांडीवर मारले, हा संविधानाशी द्रोह आहे. हे संविधानाचे गुन्हेगार आहेत. राहुल नार्वेकर, देवेंद्र फडणवीस, अमित शाह, नरेंद्र मोदी हे सगळे संविधानाचे दोषी आहेत. ते संविधान विरोधी काम करत आहेत. त्याना संविधानाच बदलायचे आहे असा माझा आरोप आहे” असं असीम सरोदे म्हणाले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.