Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भाजप सोडणार अजित पवार यांची साथ? निवडणुकीतील धक्क्यानंतर चिंतन सुरु

भाजप सोडणार अजित पवार यांची साथ? निवडणुकीतील धक्क्यानंतर चिंतन सुरु 


राज्याच्या राजकारणात पुढील तीन ते चार महिन्यात मोठ्या घडामोडी अपेक्षित आहेत. भारतीय जनता पक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी पक्षाशी युती तोडण्याची शक्यता असून एकनाथ शिंदे यांच्या पक्षासोबत विधानसभा निवडणुकीला सामोरा जाईल, असं न्यू इंडियन एक्स्प्रेसनं म्हटलं आहे.

तसं झाल्यास अजित पवार यांचं राजकीय भवितव्य काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत भाजपचा झालेला दारुण पराभव अजित पवार यांच्याशी युती केल्यामुळं झाल्याचा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रातील लेखात करण्यात आला आहे. या लेखानंतर अजित पवारांशी फारकत घेण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे.


नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनंराज्यात ४८ पैकी ३० जागा जिंकल्या. एनडीएचा घटक पक्ष असलेल्या सत्ताधारी महायुतीला केवळ १७ जागा मिळाल्या होत्या. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतदार वेगळा विचार करतात असं म्हटलं जातं. असं असलं तरी लोकसभा निवडणुकीच्यानिकालाचापरिणाम या दोन्ही राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुकांवर होणार आहे.

'संघ-भाजपचं राजकारण नेहमी पवार यांच्या विरोधात राहिलं आहे. सिंचन आणि राज्य सहकारी बँक घोटाळ्यात अजित पवारांचं नाव आल्यानंतर भाजपनं पवारांचा कडवा विरोध केला होता. मात्र, भाजपनं अचानक अजित पवार यांच्याशी हातमिळवणी केल्यानं भाजपच्या राजकारणाचा महत्त्वाचा मुद्दाच हरवला. त्यातच महायुती सरकारमध्ये अजित पवारांना उपमुख्यमंत्री करण्यात आल्यानं जखमेवर मीठ चोळलं गेलं,' अशी माहिती भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्यानं 'न्यू इंडियन एक्स्प्रेस'ला दिली.
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ-भाजपचे कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी तयार नव्हते. ते मनातून समाधानी नसल्याचंही दिसून आलं. परिणामी २०१९ मध्ये २३ वर पोहोचलेली भाजपच्या खासदारांची संख्या २०२४ मध्ये ९ वर आली. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला केवळ एकच जागा जिंकता आली. अजित पवारांशी युती केल्यामुळं भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी झाली आणि तो इतर पक्षांसारखा एक पक्ष बनला, अशी नाराजी संघाच्या मुखपत्रात व्यक्त करण्यात आली होती.

भाजप स्वत:च संभ्रमात
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार सोबत राहिल्यास काय परिणाम होईल, यावर भाजप नेतृत्व विचार करत आहे. खुद्द भाजपही पुढील निर्णयाविषयी संभ्रमात असल्याचं बोललं जात आहे. अजित पवार यांची साथ सोडल्यास भाजपवर पुन्हा 'वापरा आणि फेकून द्या' नीती वापरल्याचा आरोप होईल. तर, अजित पवार सोबत राहिल्यास नुकसान होईल अशी भीती आहे. त्यामुळं भाजप नेमका कार्य निर्णय घेणार याविषयी उत्सुकता आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.