Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शीना बोरा हत्या प्रकरणात मोठा टविस्ट :, मृतदेहाचा सांगाडाच झाला गायब

शीना बोरा हत्या प्रकरणात मोठा टविस्ट :, मृतदेहाचा सांगाडाच झाला गायब 


मुंबई : शीना बोरा हत्या प्रकरणात एक मोठा ट्विस्ट समोर आला आहे. यामध्ये शीना बोराच्या मृतदेहाचा  सांगाडाच गायब झाल्याचे समोर आले आहे. मृतदेहाच्या सांगाड्यातील जळलेली हाडं सीबीआयला सापडत नाहीयेत.

सत्र न्यायालयातील सुनावणीमध्ये सीबीआयने साक्षीदार हजरच केले नाहीत. तसंच सीबीआय जप्त केलेल्या सांगाड्यातील काही हाडं कोर्टात सादर करणार होती.

या हाडांच्या आधारावर सरकारी जेजे रुग्णालयाततील अनाटॉमी विभागाचे साहाय्यक प्राध्यापकांची साक्ष होणार होती. मात्र ही हाडं सापडतच नसल्याची सीबीआयच्या वकिलांकडून कोर्टामध्ये देण्यात आली. ही हाडे सापडत नसल्यामुळे तब्बल 3 वेळा याप्रकरणाची सुनावणी तहकूब करण्यात आली होती.

शीना बोरा हत्या प्रकरणावर आली वेब सिरीज
काहीच दिवसांपूर्वी शीना बोरा हत्या प्रकरणावर एक वेब सीरिजही आली होती. या वेब सीरिजविरोधात सीबीआयने कोर्टात धाव घेतली होती. वेब सीरिज प्रकाशित केली तर त्याचा केसवर परिणाम होईल, असा दावा सीबीआयकडून केला गेला होता, पण कोर्टाने ही वेबसीरिज रिलीज करण्यास परवानगी दिली होती.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.