Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'एयर इंडिया ' सुरु करणार देशातील पहिले पायलट ट्रेनिगं स्कूल :, महाराष्ट्रतील ' या ' जिल्ह्यात उभारणार!

'एयर इंडिया ' सुरु करणार देशातील पहिले पायलट ट्रेनिगं स्कूल :, महाराष्ट्रतील ' या ' जिल्ह्यात उभारणार!


एअर इंडिया या देशातील नामांकित विमान वाहतूक कंपनीने स्वतःचे पायलट ट्रेनिंग स्कूल (फ्लाईंग स्कूलक) सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे हे देशातील अशा पद्धतीचे पहिलेच पायलट ट्रेनिंग स्कूल ठरणार आहे. ज्याची उभारणी कंपनीकडून महाराष्ट्रातील अमरावती येथे केली जाणार आहे. या फ्लाईंग स्कूलमध्ये वर्षाकाठी 180 वैमानिकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता असेल. ज्या वैमानिकांना अगोदर उड्डाणाचा अनुभव नाही, त्यांना स्कूलमध्ये प्रवेश दिला जाणार आहे.

काय आहे कंपनीचा उद्देश?

एअरलाइन अर्थात विमान वाहतूक उद्योगात करिअर करणाऱ्या तरुणांना उत्कृष्ट संधी उपलब्ध करून देणे. हा पायलट ट्रेनिंग स्कूल सुरु करण्यामागील कंपनीचा मुख्य उद्देश आहे. फ्लाइंग स्कूल सुरु करण्याचा उपक्रम हा एअर इंडियाच्या देशांतर्गत प्रशिक्षण सुविधा वाढविण्याच्या आणि कुशल वैमानिकांच्या विकासासाठी योगदान देण्याच्या व्यापक धोरणाचा एक भाग असणार आहे.

कुशल वैमानिक तयार होण्यास मदत होणार
सध्याच्या घडीला भारतात तसेच तसेच जागतिक स्तरावर वैमानिकांची मागणी वाढत आहे. ही बाब लक्षात घेऊन अपेक्षित कमतरता दूर करण्यासाठी एअर इंडिया महाराष्ट्रातील अमरावती येथे या स्कूलची स्थापना करणार आहे. या ठिकाणी प्रशिक्षणाचे सर्व टप्पे पूर्ण झाल्यावर, एअर इंडियाच्या कॉकपिटपर्यंत थेट मार्ग उपलब्ध करून दिला जाणार आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे या क्षेत्रात करिअर करु इच्छिणाऱ्या तरुणांना चांगली संधी आहे. या निर्णयामुळे देशाअंतर्गत प्रशिक्षण देण्यात येणार असून, कुशल वैमानिक तयार होण्यास मदत होणार आहे.
कसा असेल प्रशिक्षण प्रोग्राम?

प्रशिक्षणामध्ये प्रारंभिक, उच्च आणि व्यावसायिक वैमानिक प्रशिक्षण प्रोग्रामचा समावेश असणार आहे. तसेच, एअर इंडियाच्या फ्लाइंग स्कूलमध्ये प्रशिक्षणासाठी अत्याधुनिक आणि प्रगत विमान वाहतूक उपकरणे वापरली जाणार आहेत. यामध्ये उच्च दर्जाचे फ्लाइंग सिम्युलेटर आणि इतर विमानसेवेशी संबंधित उपकरणांचा समावेश असणार आहे. असे एअर इंडियाकडून सांगण्यात येत आहे.

कसा मिळेल विद्यार्थ्यांना प्रवेश?
सध्या देशातील 40 टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थी पायलट क्षेत्रातील प्रशिक्षण परदेशात घेतात. या प्रशिक्षणाची किंमत जवळपास 1.5 चे 2 कोटी रुपये असू शकते. मात्र, आता विद्यार्थ्यांना भारतातच प्रशिक्षण उपलब्ध होणार आहे. दरम्यान, या पायलट ट्रेनिंग स्कूलमध्ये प्रवेश घ्यायचा असल्यास त्यासाठी निवड प्रक्रिया कठीण असणार आहे. तसेच प्रवेश घेणाऱ्या उमेदवाराची शैक्षणिक पात्रता, वैयक्तिक मुलाखत तसेच शारीरिक तंदुरुस्ती यांच्या आधारे त्यांचे मूल्यांकन करुन प्रवेश दिला जाणार आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.