Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शरिराच्या ' या ' भागावर तीळ म्हणजे राजयोगाची निशाणी! मिळतो प्रचंड पैसा

शरिराच्या ' या ' भागावर तीळ म्हणजे राजयोगाची निशाणी! मिळतो प्रचंड पैसा 


शरीरावर विविध ठिकाणी आढळणारे तीळ हे केवळ त्वचेची खुण नसून, त्यांचा अर्थ आणि महत्त्व शास्त्रात सांगितले आहे. समुद्र शास्त्रानुसार, तीळ एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्व, नशीब आणि आयुष्यातील अनेक पैलूंबद्दल सखोलपणे माहिती देतात.

या तिळच्या माध्यमातून व्यक्तीच्या आयुष्यात असलेले राजयोगसुद्धा जाणून घेता येतात. जोतिषशास्त्रानुसार मनुष्याच्या शरिरावर असलेले तीळ हे राहूचे प्रतीक समजले जाते. शिवाय शरीराच्या कोणत्या भागावर तीळ आहे हेसुद्धा महत्वाचे असते. शरीराच्या उजव्या बाजूला असणारे तीळ अत्यंत शुभ आणि लाभदायक मानले जातात. परंतु यामध्ये असे पाच अंग आहेत जिथे तीळ असणे जास्त लाभदायक असते. तर तुम्हालाही शरीरावर उजव्या बाजूला तीळ असेल तर तुमचेसुद्धा नशीब फळफळणार आहे असे समजून जा.
जोतिषशास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या दोन्ही भुवयांच्या मध्यभागी जर तीळ असेल, तर त्या व्यक्ती अत्यंत हुशार आणि बुद्धिमान असतात. अशा लोकांची वेगाने प्रगती होते. तसेच जर एखाद्या व्यक्तीच्या कपाळावर तीळ असेल तर ती व्यक्ती अतिशय नशीबवान असते. त्यांच्याकडे प्रचंड पैसा आणि सुख असते. त्यामुळे त्यांना फारसे कष्ट घ्यावे लागत नाहीत. 

उजव्या कानावर तीळ असणेदेखील अत्यंत शुभ समजले जाते. असे लोक चांगले श्रोते असतात. ते चांगल्या गोष्टी काळजीपूर्वक लक्ष देऊन ऐकतात आणि त्या अंमलात आणतात. त्यामुळेच त्यांना यश मिळण्यास मदत होते. जर मोठ्या बोटाखाली शनिच्या पर्वतावर तीळ असेल, त्यांना नवीन मित्र बनवायला आवडतात. तसेच ते खूप मेहनती आहेत. शनि पर्वतावर तीळ असलेल्या व्यक्तीला संमिश्र परिणाम मिळतात.
त्याचबरोबर उजव्या हातावर लाल रंगाची तीळ असणेसुद्धा अत्यंत फायदेशीर असते. या व्यक्तीच्या हातात भरपूर पैसा असतो. या लोकांना कोणत्याही क्षेत्रात गुंतवणूक केल्यास फायदाच मिळतो. शिवाय हे लोक प्रचंड दानधर्म करूनसुद्धा आरामदायी आयुष्य जगत असतात. या लोकांवर नेहमीच लक्ष्मी प्रसन्न असते. तसेच तळहातावर मध्यभागी लाल रंगाचा तीळ असेल तर तो राजयोगाचा संकेत देत असतो. अशा व्यक्तींच्या आयुष्यात राजयोग असतो. अर्थातच हे लोक ऐषोआरामी आयुष्य जगतात.

तीळचे स्थान आणि व्यक्तीचा स्वभाव:
पाठीच्या डावीकडे तीळ असणारी लोकं कंजूस कंजूश प्रवृत्तीचे असतात.

व्यक्तीच्या उजव्या तळहातावर जर तीळ असेल तर तो व्यक्ती धनवान असतो.

डाव्या तळहातावर तीळ असणारे व्यक्ती खर्चीक असतात.

पाठीच्या उजवीकडे तीळ असणारे व्यक्ती बुद्धिमान आणि भाग्यवान असतात.

उजव्या पायावर तीळ असणारे वक्यक्ती व्यक्ती बुद्धिमान असतात.

ज्या व्यक्तींच्या डाव्या पायावर तीळ असतात ते व्यक्ती खर्चीक असतात.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.