Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

उद्धव ठाकरे शिंदेच्या ' त्याच ' आमदारांना पुन्हा प्रवेश देणार, नेमक्या अटी काय?

उद्धव ठाकरे शिंदेच्या ' त्याच ' आमदारांना पुन्हा प्रवेश देणार, नेमक्या अटी काय?


मुंबई : महाराष्ट्रात  पुन्हा राजकीय भूकंप घडण्याची चिन्ह असून लवकरच पुन्हा एक नवा धक्का महाराष्ट्राच्या  जनतेला बसण्याची शक्यता आहे. शिवसेना शिंदे गटाचे  काही आमदार ठाकरेंच्या संपर्कात असल्याची माहिती ठाकरे गटाच्या  एका वरिष्ठ नेत्यानं एबीपी माझाला दिली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. तसेच, यामुळे आता राज्यात पुन्हा राजकीय भूकंप  पाहायला मिळणार का? अशाही चर्चा रंगल्या आहेत.

लोकसभा निवडणूक आणि लोकसभा निवडणुकांचा निकाल यादरम्यान, एकूण सहा आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती ठाकरे गटाच्या वरिष्ठ नेत्यांनी एबीपी माझाला दिली आहे. शिवसेना ठाकरे गटात घेत असताना ज्या आमदारांनी तटस्थ भूमिका घेतली, त्यांचाच विचार ठाकरे गटाकडून केला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. प्रामुख्यानं मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातील आमदार ठाकरेंच्या संपर्कात आहे, अशी माहिती मिळत आहे. लोकसभा निकालानंतर शिंदे गटाला हा सर्वात मोठा धक्का असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पक्ष फुटीनंतर ज्या आमदारांनी शिवसेना ठाकरे गटावर टोकाचा विरोध करणं टाळलं किंवा ठाकरेंच्या विरोधात कुठल्याही टोकाची प्रतिक्रिया न देता शिवसेना शिंदे गटात राहूनसुद्धा तटस्थ भूमिका ठेवली, अशाच आमदारांचा ठाकरे गटात प्रवेश होण्याची शक्यता असल्याची माहिती ठाकरे गटाच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. लवकरच या आमदारांची घरवापसी होणार असून ते ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

आमदारांचा आकडा 40 असू शकतो : सचिन अहिर
शिवसेना ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी एबीपी माझाला याबाबत प्रतिक्रिया दिला. ते म्हणाले की, "6 ते 7 हा आकडा कुठून आला मला माहिती नाही, पण हा आकडा 16ही असू शकतो, 20 सुद्धा असू शकतो किंवा 40 देखील असू शकतो."

"ज्या लोकांना वाटलं की, आता आमचंच सरकार राहणार आहे, आता आम्हीच निवडून येणार आहोत, ज्यांनी शपथ घेऊन सांगितलेलं आता एकाही आमदार-खासदाराला मी सोडू देणार नाही, आता निकालानंतर अस्वस्थता वाढणारच, त्यांच्या मतदारसंघात, त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थतेचं वातावण झालं आहे. याचा पश्चाताप त्यांना होत असेल तर ते ती संख्या सहा नाही, तर 10 किंवा 20 असू शकते.", असं सचिन अहिर म्हणाले आहेत.

"आता लोकसभा निवडणुकांमध्येही अनेक आमदारांनी, अपक्ष नेत्यांनी आमचा विचार करा, अशी गळ घातली होती. आम्ही लोकसभेत मदत करतो, विधानसभेत आमचा विचार करा, असंही त्यांनी सांगितलं. पण, आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं. पण त्यावेळी आम्ही स्पष्ट सांगितलेलं की, दरवाजे बंद आहेत."

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.