Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

प्लास्टिकपासून बनवली जात आहे साखर? व्हिडीओ व्हायरल, FSSAI सांगितलं कशी ओळखाल भेसळ!

प्लास्टिकपासून बनवली जात आहे साखर? व्हिडीओ व्हायरल, FSSAI सांगितलं कशी ओळखाल भेसळ!

आजकाल खाण्या-पिण्याच्या गोष्टींमध्ये भेसळ करण्यात येत असल्याच्या अनेक घटना समोर येत असतात. पनीर, दूध, तांदूळ, पीठ, फळं-भाज्या, मसाले, डाळी आणि साखर यात भेसळ केली जाते. महत्वाची बाब म्हणजे फेक आणि ओरिजनल यात फरक करणंही अवघड होतं. सध्या एक नकली साखर बनवण्याच्या व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यात दावा करण्यात आला आहे की, प्लास्टिकपासून साखर बनवली जात आहे. यात दिसणारी गोष्टी साखरेसारखीच दिसते.

भेसळयुक्त गोष्टींचं सेवन केल्याने आरोग्य धोक्यात येत आहे. NCBI वर प्रकाशित एका रिसर्चनुसार, भेसळयुक्त खाद्य पदार्थ खाल्ल्याने जुलाब, मळमळ, उलटी, एलर्जी, डायबिटीस, हार्ट डिजीजसारख्या गंभीर समस्या होतात. काही भेसळयुक्त पदार्थांमध्ये तर कॅन्सर करणारे तत्वही असतात. पदार्थांमध्ये भेसळ हा सद्या एक मोठा गंभीर चिंतेचा प्रश्न आहे. जास्त पैसे कमी कमावण्यासाठी मोठ्या प्रमाणात भेसळ केली जात आहे. याने आरोग्य बिघडत आहे आणि शरीराला काही पोषणही मिळत नाही.

साखरेत केली जाते भेसळ

FSSAI नुसार, तुमच्या जी साखर खात आहात त्यात भेसळ असू शकते. जेव्हा जेव्हा साखर आणि गूळाचे भाव वाढतात तेव्हा साखरेत भेसळ खूप केली जाते. साखरेत सामान्यपणे खडू पावडर आणि पांढरी वाळू मिक्स केली जाते. ज्यामुळे पोटाच्या समस्या होतात.


भेसळयुक्त साखर कशी ओळखला

FSSAI ने एक सोपी गाइडलाईन जारी केली आहे. ज्याव्दारे तुम्ही हे जाणून घेऊ शकता की, तुम्ही खरेदी केलेले पदार्थ भेसळयुक्त आहेत की नाही.

मधात साखरेची भेसळ कशी ओळखाल?

एका पारदर्शी ग्लासमध्ये पाणी घ्या. ग्लासमध्ये मधाचे काही थेंब टाका. भेसळयुक्त नसलेल्या साखरेचं मध ग्लासच्या तळाला जाऊन चिकटेल. जर मधात भेसळ असेल तर साखरेच्या सिरपसारखं ते पाण्यात विरघळू लागेल.

साखरेत खडू पावडर आहे की नाही कसं ओळखाल

दोन ग्लास पाणी घ्या. दोन्हीमध्ये काही ग्रॅम साखर टाका आणि चांगली मिक्स करा. भेसळ नसलेली साखर पाण्यात चांगली विरघळेल. तर भेसळ असलेली साखर चांगली विरघळत नाही. ग्लासमध्ये साखरेचे काही कण बाकी राहतात.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.