Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

RCF मध्ये सरकारी नोकरीची सुवर्णंसंधी :, पात्रता 10 वी पास, वेतन 42 हजार दरमहा!

RCF मध्ये सरकारी नोकरीची सुवर्णंसंधी :, पात्रता 10 वी पास, वेतन 42 हजार दरमहा!


दहावी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे. राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स अर्थात आरसीएफमध्ये नवीन भरतीची जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जून 2024 असणार आहे.

संस्था - राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स
पद संख्या - 10 पदे
भरले जाणारे पद - ज्युनियर फायरमन ग्रेड II - पद संख्या - 10 पदे
अर्ज करण्याची पद्धत - ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 29 जून 2024 (05:00 PM)

आवश्यक शैक्षणिक पात्रता - 10 वी उत्तीर्ण, फायरमन प्रमाणपत्र

वयोमर्यादा -
1. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जून 2024 रोजी 18 ते 29 वर्षे
2. SC/ST - 05 वर्षे सूट
3. OBC - 03 वर्षे सूट
परीक्षा फी -
1. जनरल/ओबीसी/EWS - 700 रुपये.
2. SC/ST/ExSM/महिला - फी नाही

कसे आहे नोकरीचे स्वरूप?

आरसीएफमधील या नोकरीसाठी रात्रीच्या शिफ्टसह फिरत्या शिफ्टमध्ये काम करणे आवश्यक आहे. निवड झालेल्या उमेदवाराला लिंग विचारात न घेता कोणत्याही प्लांटमध्ये पोस्ट केले जाऊ शकते. या नोकरीसाठी जड स्वरूपाच्या नोकऱ्यांसाठी उच्च पातळीची शारीरिक तंदुरुस्ती आवश्यक आहे. ज्यात उपकरणे उचलणे/व्हॉल्व्ह ऑपरेशन्स इ. याशिवाय उमेदवारांची निवड/तात्पुरती निवड झाल्यास त्यांना या पदांसाठी वैद्यकीय आणि शारीरिक तंदुरुस्तीच्या मानकांची पूर्तता करणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे नियुक्तीच्या तारखेपासून फायर टेंडर / जड मोटार वाहन चालवणे अनिवार्य असणार आहे.

किती मिळणार वेतन - 18,000/- ते 42,000/- रुपये दरमहा
नोकरीचे ठिकाण - मुंबई

अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट - www.rcfltd.com ला भेट द्या.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.