Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Whats App ची मोठी कारवाई :, 71लाख भारतीयांचे अकाऊंट केले बंद, कारण काय..?

Whats App ची मोठी कारवाई :, 71लाख भारतीयांचे अकाऊंट केले बंद, कारण काय..?


लोकप्रिय मेसेजिंग अॅप WhatsApp ने 71 लाख भारतीय युजर्सचे अकाउंट बंद केले आहेत. म्हणजेच, ते आता या मेसिजिंग प्लॅटफॉर्मचा वापर करू शकणार नाहीत. यातील बहुतांश खाती सायबर फ्रॉड आणि घोटाळ्यांशी संबंधित आहेत, तर काहींनी व्हॉट्सॲपच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे अहवालात उघड झाले आहे.
व्हॉट्सॲपने आपला मासिक अहवाल जारी केला आहे. यात सांगितल्यानुसार, Meta च्या मेसेजिंग ॲप व्हॉट्सॲपने सुमारे 71 लाख भारतीय अकाउंट बंद केले आहेत. हे अकाउंट 1 एप्रिल 2024 ते 30 एप्रिल 2024, या कालावधीत तयार करण्यात आली आहेत. या युजर्सनी ॲपचा गैरवापर केल्याचे कंपनीने सांगितले. तसेच, इतर युजर्सनीदेखील कंपनीच्या धोरणाचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावरही बंदी घालण्यात येईल, असेही कंपनीने म्हटले आहे.

WhatsApp अॅडव्हान्स लर्निंग मशीनचा वापर करते
व्हॉट्सॲपने एकूण 71,82,000 खाती बंद केली आहेत. ही सर्व खाती 1 एप्रिल ते 30 एप्रिल 2024 दरम्यान बंद करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, कंपनी अॅडव्हान्स मशीन लर्निंगचा वापर आणि डेटा अॅनालायज करते. याद्वारे संशयास्पद अकाउंट्स ओळखले जातात. अशाप्रकारे आतापर्यंत लाखो खाती बंद करण्यात आली आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.