Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

टँकरला कापत गेली आराम बस :, 18 जण जागीच ठार; व्हिडिओ पहा

टँकरला कापत गेली आराम बस :, 18 जण जागीच ठार; व्हिडिओ पहा


उन्नाव : उत्तर प्रदेशातील लखनऊ-आग्रा एक्सप्रेस वेवर बुधवारी पहाटे भीषण अपघात झाला. या अपघातात १८ जणांचा मृत्यू झाला असून ३० जण जखमी झाले आहेत. बिहारच्या सीतामढी जिल्ह्यातील प्रवाशांना घेऊन डबल डेकर बस दिल्लीला निघाली होती. बस उन्नाव जिल्ह्याच्या सीमाभागात पोहोचताच दूध टँकरला मागून धडकली. ही धडक इतकी भीषण होती की बस टँकरला कापत पुढे गेली. अपघातानंतरचा एक व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.

हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार, अपघात उन्नावच्या गढा गावाजवळ झाला. बस बिहारवरून दिल्लीला निघाली होती. तेव्हा ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात टँकरला धडकली. त्यामुळे बस उलटली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उन्नावमधील अपघाताची माहिती घेतली असून मृतांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाऊन तात्काळ बचावकार्य राबवण्याचे आदेश दिले आहेत. जखमींवर योग्य ते उपचार करा असंही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बसमधील बहुतांश प्रवासी हे कामगार होते. सर्व जखमींना उपचारासाठी निरबी रुग्णालयात दाखल केलं आहे.
बुधवारी पहाटे सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास आग्रा - लखनऊ एक्सप्रेस वेवर बिहारवरून दिल्लीला जाणाऱ्या डबलडेकर बसने दूधाच्या टँकरला धडक दिली. यात १८ जण जागीच मृत्यूमुखी पडले. अपघात इतका भयंकर होता की घटनास्थळी मृतदेहांचा खच पडला होता. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून त्यांची ओळख पटवण्यात येत आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.