Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

4 गर्लफ्रेंडचें हट्ट पुरवण्यासाठी 21वर्ष्याच्या तरुणांन जे केले ते पाहून बसेल धक्का

4 गर्लफ्रेंडचें हट्ट पुरवण्यासाठी 21वर्ष्याच्या तरुणांन जे केले ते पाहून बसेल धक्का 


छत्रपती संभाजीनगर : अवघ्या 21 वर्षाच्या पठ्याने आपल्या चार प्रेयसींचे लाड पुरवण्यासाठी आणि त्यांचा खर्च भागवण्यासाठी धक्कादायक कृत्य केलंय. शहरातून विविध ठिकाणावरून आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने मोटरसायकल चोरण्याचा धंदा सुरू केला. चोरीच्या मोटरसायकलच्या पैशातून तो आपल्या प्रेयसींचे लाड पूरवत होता. विशेष म्हणजे हा पठ्ठ्या उच्चशिक्षित असून बीएससी कम्प्युटर झालेला आहे. मात्र या पठ्ठ्याला आता जेलची हवा खावी लागणार आहे.

चार गर्लफ्रेंडचे हट्ट पुरवण्यासाठी पैशाची गरज भासू लागल्याने मास्टर कीचा वापर करून अवघ्या 21 वर्षाच्या तरुणाने चक्क 25 दुचाकी चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार संभाजी नगरात समोर आलाय. दुचाकी पळविणाऱ्या सराईत आरोपीला हर्सूल पोलिसांनी आता बेड्या ठोकल्या असून, त्याच्याकडून 14 दुचाकी हर्सूल पोलीसांनी हस्तगत केल्या आहेत. आदित्य राजेंद्र मोहिते असे या आरोपीचे नाव आहे. पोलिसांकडून अन्य दोन साथीदारांचा शोध सुरू असून, दुचाकींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान हर्सूल पोलीस ठाण्याच्या हद्दीतून काही दिवसापूर्वी एक दुचाकी चोरीला गेली होती. तिचा शोध घेता घेता या आरोपीचे सगळं गौडबंगाल समोर आल. आदित्यच्या वडिलांचे निधन झाले असून, तो आईसोबत चेतनानगर भागात राहतो. मास्टर कीं'च्या मदतीने काही क्षणांत तो दुचाकी चोरी करत होता.
आदित्य चे बीएससी पर्यंत शिक्षण झालंय. मैत्रिणीवर खर्च करण्यासाठी तो दुचाकी चोरायचा. चोरीची मोटरसायकल ठराविक ठिकाणी उभी करण्यास दोन मित्र सांगायचे. त्याने उभी केलेली मोटरसायकल मित्र घेऊन जायचे आणि त्या मोबदल्यात आदित्यला दोन ते तीन हजार रुपये द्यायचे. प्रेयसीचे लाड पुरवणे दूरच मात्र आता आदित्यला जेलची हवा खावी लागणार आहे.

पोलिसांनी जेव्हा या तरुणाला ताब्यात घेतलं आणि विचारपूस केली त्यावेळेस मी मोटरसायकल चोरायचो आणि ठराविक ठिकाणी त्या लावायचो असं त्याने सांगितलं. तिथून दोन साथीदार त्या घेऊन जायचे त्या मोबदल्यात मला दोन ते तीन हजार मिळायचे. आपल्याला चार मैत्रिणी आहेत आणि त्यांचा खर्च भागवण्यासाठी आपण हे सर्व करत असल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलीस देखील काही चक्रावून गेले, पोलिसांकडून 25 मोटरसायकल चोरी केलेल्या होत्या त्यातून 16 हस्तगत करण्यात यश आले आहे. बाकी मोटरसायकल आणि इतर दोन साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत अशी माहिती पोलीस निरीक्षक सुनिता मिसाळ यांनी दिली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.