Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पुणे - सोलापूर महामार्गांवर कारचे टायर फुटल्याने भीषण अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू

पुणे - सोलापूर महामार्गांवर कारचे टायर फुटल्याने भीषण अपघातात 4 जनांचा जागीच मृत्यू 


पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कारचं टायर फुटल्यानं भीषण अपघात झाला. यामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झालाय. इंदापूर तालुक्यातील डाळज येथे दुपारी हा अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की यामध्ये गाडीच्या पुढच्या बाजूचा पूर्ण चक्काचूर झालाय. अपघातानंतर स्थानिकांनी तात्काळ मदत केली. जखमी प्रवाशाला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नेमकं कसा झाला अपघात?

पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पुण्याकडून सोलापूरच्या दिशेने निघालेली (टी एस ०७ जी एल २५७४) ही गाडी डाळज हद्दीत आल्यानंतर अपघात झाला. या गाडीचा पुढील डाव्या बाजूचा टायर फुटल्याने साधारण 50 मीटर गाडी जमिनीला घासत येऊन कोसळली. गाडीने रस्त्यावर चार ते पाच पलट्या खात ड्रेनेज लाईनच्या सिमेंट खांबाला जोरात धडक दिली, त्यानंतर नाल्यात जाऊन पडली. गाडीत सहा पुरुष होते त्यापैकी 4 जण जागीच ठार झाले होते, तर एकजण गंभीर जखमी झालाय तर एकजण किरकोळ जखमी झाला आहे. जखमीवर जवळील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
इरफान पटेल वय 24 वर्षे , मेहबूब कुरेशी ,वय 24 वर्षे , फिरोज कुरेशी, वय 26 वर्षे ,फिरोज कुरेशी वय 28 वर्षे हे सर्व जागीच मयत झाले आहेत. रफिक कुरेशी वय 34 वर्षे हा गंभीर जखमी झाला असून सय्यद इस्माईल सय्यद अमीर ह्याला किरकोळ मार लागला आहे. अपघातातील सर्वजण तेलंगणा राज्यातील नारायणखेड , तालुका जिल्हा मेंढक येथील आहेत. अपघाताची माहिती समजताच डाळज महामार्गाचे पोलीस तात्काळ घटनास्थळी जाऊन अपघातातील जखमींना व ठार झालेल्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.