Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शाळा सुरु होऊन 4 दिवस झाले, वॉशरूमला गेलेल्या चिमुकलीसोबत घडलं भयंकर, गमावला जीव

शाळा सुरु होऊन 4 दिवस झाले, वॉशरूमला गेलेल्या चिमुकलीसोबत घडलं भयंकर, गमावला जीव 


उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपून प्राथमिक शाळांचे नवे शैक्षणिक वर्ष नुकतेच सुरू झाले आहे. काही ठिकाणी १५ जूनला तर काही ठिकाणी १ जुलैला शाळा सुरू झाल्या. शाळा सुरू झाल्यानंतर तिसऱ्याच दिवशी भंडाऱ्यात पहिलीतील विद्यार्थीनीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलीय.

शाळेत वीजेचा शॉक बसल्यानं चिमुकलीचा मृत्यू झाला. याबाबत मिळालेली माहिती अशी की, भंडारा जिल्हा परिषदेच्या शाळेत पहिलीच्या वर्गात शिकणाऱ्या यशस्वी सोपान राऊत हिचा मृत्यू झाला. भंडारा जिल्ह्यातील पुयार इथं जिल्हा परिषदेच्या शाळेत तिने नुकताच प्रवेश घेतला होता. १ जुलै रोजी शाळा सुरू झाली होती. बुधवारी ३ जुलैला यशस्वी राऊत ही सकाळी शाळेत आली. तेव्हा शाळेत लावण्यात आलेल्या ROच्या तारेचा करंट तिला लागला. यात ती स्वच्छतागृहातच बेशुद्ध होऊन पडली.

स्वच्छतागृहात ६ वर्षांची चिमुकली बेशुद्ध पडल्याचं समजताच तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या यशस्वीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. शाळेला सुरुवात होऊन अवघ्या तिसऱ्याच दिवशी विद्यार्थीनीचा अशा पद्धतीने मृत्यू झाल्याने पालकांनी संताप व्यक्त केला आहे. या घटनेची नोंद पोलिसात झाली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.