Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना 5 महिन्यांच्या तुरुगवास

सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना 5 महिन्यांच्या तुरुगवास


नवी दिल्ली : दिल्लीच्या साकेत न्यायालयाने सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना 5 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. 23 वर्षांपूर्वीच्या प्रकरणात ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. दिल्लीचे LG व्हिके सक्सेना यांनी दाखल केलेल्या फैजदारी मानहानीच्या खटल्यात न्यायालयाने पाटकर यांना ही कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच सक्सेना यांना 10 लाखांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात कमाल शिक्षा दोन वर्षांची आहे, मात्र मेधा पाटकर यांच्या प्रकृतीचा विचार करून पाच महिन्यांची शिक्षा ठोठावण्यात आल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. ही शिक्षा 30 दिवसांसाठी स्थगित ठेवण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.


दिल्लीच्या साकेत न्यायालयाने 2001 मध्ये दिल्लीचे एलजी व्हीके सक्सेना यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात 24 मे रोजी साकेत न्यायालयाने मेधा पाटकर यांना दोषी ठरवले होते. सक्सेना यांनी पाटकर यांच्यावर खोटे आरोप, उपहासात्मक वक्तव्ये आणि बद‌नामी केल्याचा आरोप करत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. सक्सेना यांच्याविरोधात पाटकर यांनी केलेली वक्तव्ये केवळ बदनामीकारकच नाहीत, तर ती नकारात्मक धारणांना भडकावण्यासाठीही तयार करण्यात आल्याचे कोर्टाचे म्हटले होते.
25 नोव्हेंबर 2000 रोजी मेधा पाटकर यांनी इंग्रजीत निवेदन जारी करून वीके सक्सेना यांच्यावर हवालाद्वारे व्यवहार केल्याचा आरोप केला होता आणि त्यांना भित्रा म्हटले होते. मेधा पाटकर म्हणाल्या होत्या की, व्हीके सक्सेना गुजरातमधील लोक आणि त्यांची संसाधने परकीय हितासाठी गहाण ठेवत असल्याचे पाटकर म्हणाल्या होत्या. व्हीके सक्सेना यांनी 2001 मध्ये अहमदाबाद कोर्टात मेधा पाटकर यांच्याविरुद्ध फौजदारी मानहानीचा खटला दाखल केला होता. गुजरातच्या ट्रायल कोर्टाने या प्रकरणाची दखल घेतली होती.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.