Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

7 फेरे घेत होता नवरदेव :, इतक्यात मोबाईलवर आले ' ते ' फोटो पाहून मंडप सोडून पळाला....

7 फेरे घेत होता नवरदेव :, इतक्यात मोबाईलवर आले ' ते ' फोटो पाहून मंडप सोडून पळाला....


लखनऊ : लग्नाचं एक अजब प्रकरण समोर आलं आहे. यात लग्नादरम्यान वर जेव्हा सात फेरे घेण्यासाठी मंडपात पोहोचला तेव्हा त्याच्या मोबाईलवर एकामागून एक अनेक फोटो आणि व्हिडिओ आले. हे सर्व व्हॉट्सॲपवरून पाठवण्यात आले होते.
मोबाईलवर सततनोटिफिकेशन येत असल्याने नवरदेवाने फोन उघडला. यानंतर सर्व फोटो पाहिले आणि व्हिडिओही पाहिला तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. यानंतर त्याला एक फोनही आला. फोन आल्यावर फोन करणाऱ्याने नवरदेवाला सांगितलं की, त्या मुलीशी लग्न करू नकोस, ती माझी आहे आणि मी तिच्याशीच लग्न करणार आहे. यानंतर वर मंडपातून बाहेर आला आणि त्याने लग्नास नकार दिला. घटना उत्तर प्रदेशातील आहे.

मोबाईल फोनवर मिळालेले फोटो आणि व्हिडिओमध्ये वधू दुसऱ्या मुलासह दिसत होती. हे सर्व फोटो दोघांमधील प्रेमाची संपूर्ण कहाणी सांगत होते. तर व्हिडिओ आणखीच आक्षेपार्ह होता. वर मंडपातून बाहेर येताच एकच गोंधळ उडाला आणि मुलीच्या कुटुंबीयांनी त्याला याचं कारण विचारलं. मुलाच्या कुटुंबाचीही तीच अवस्था होती. ते नवरदेवाला विचारत होते की, आत्तापर्यंत सगळं ठीक होतं, अचानक काय झालं? यावर वराने वधूचे फोटो आणि व्हिडिओ सर्वांना दाखवले.
लग्नघरात गावभरातील पाहुणे आले होते. फोटो आणि व्हिडिओमध्ये दिसणारा मुलगाही गावातील होता. सर्वांनी त्याला ओळखलं. गावात गदारोळ झाला आणि मग लोकांनी पंचायत बोलावली. पंचायत बसली आणि सर्वजण नवरदेवाला समजावू लागले. पण वराला ते मान्य नव्हतं. तो म्हणाला, की ही वधू आणि त्या मुलाची बाब आहे, यामुळे माझे आयुष्य उद्ध्वस्त होईल. घरातील, गावातील, पंचायतीतील लोकांनी समजूत काढल्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आलं. पोलिसांनी वधू-वरांना पोलीस ठाण्यात बोलावून सर्व प्रकार समजून घेतला.

यानंतर गावात शांतता आणि कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, असे सांगत त्यांना स्वत: निर्णय घेण्यास सांगण्यात आलं. यानंतर लग्नाची वरात वधूशिवाय परतली. पोलिस स्टेशन प्रभारी शोकेंद्र बालियान यांनी सांगितलं की, वराला फोटो आणि व्हिडिओ पाठवणारा आरोपी वधूच्या गावातील रहिवासी आहे. या प्रकरणी फिर्यादीच्या आधारे त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येत आहे. वधूच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल करून संपूर्ण घटनेची माहिती दिली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.