Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

फोन चार्जिंगचा 80:20 नियम अनेकांना माहित नाही

फोन चार्जिंगचा 80:20 नियम अनेकांना माहित नाही

मुंबई : स्मार्टफोन ही काळाची गरज झाली आहे. त्यामुळे प्रत्येकाला फोन लागतोच. त्याच्याशिवाय कोणी राहूच शकत नाही. एखाद वेळेस चुकून बॅटरी संपली किंवा फोन विसरले तर माणसाला विना फोनचं चुकल्या चुकल्या सारखं होतं.

त्यामुळे लोक घराबाहेर पडताना फोन नेहमी चार्ज करुनच बाहेर पडतात. पण कधीकधी खराब बॅटरी लाईफमुळे लोकांना फोन वारंवार चार्ज करण्याच्या समस्या उद्भवतात. खरंतर खराब बॅटरीसाठी कारणीभूत आहे आपली फोन चार्ज करण्याची चुकीची पद्धत. खरंतर आपणच चुकीच्या पद्धतीने फोन चार्ज करतो, ज्यामुळे त्यातील बॅटरीचं आयुष्य कमी होतं आणि ती सतत उतरु लागते.

यासाठी तुम्हाला फोन चार्ज करण्याची योग्य पद्धत माहित असायला हवी जेणे करुन तुमच्या बॅटरीची लाईफ चांगली राहिल. यासाठी तुम्हाला 80-20 नियम फॉलो करावा लागेल. खरंतर फोनची बॅटरी खूप महत्त्वाची असते. जर बॅटरी स्वतःच कालांतराने खराब होऊ लागली तर याचा अर्थ फोन देखील खराब होईल. आता हा 80-20 रूल किंवा नियम काय आहे चला जाणून घेऊ.

वास्तविक, अनेक लोकांचा असा विश्वास आहे की फोनची बॅटरी 0 टक्क्यांपर्यंत पोहोचल्यावरच फोन चार्ज कराव आणि फोन 100 टक्के चार्ज करुन एकदाच वापरावं, पण ही चुकीची पद्धत आहे. फोनची बॅटरी पूर्णपणे डिस्चार्ज किंवा पूर्ण चार्ज झालेली नसावी, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कोणत्याही डिव्हाइसमध्ये सर्वोत्तम बॅटरी लाईफसाठी 20-80 चा रेशो किंवा गुणवत्तर लक्षात ठेवले पाहिजे.

याचा अर्थ जेव्हा बॅटरी 20 टक्के शिल्लक राहते, तेव्हा ती चार्जवर ठेवली पाहिजे. जेव्हा ते 80 टक्क्यांपर्यंत पोहोचते, तेव्हा त्याला चार्जिंग करणं बंद केलं पाहिजे. तुम्ही जास्तीत जास्त बॅचरी 90 टक्के चार्ज करु शकता. तुम्ही हा नियम पाळल्यास तुमच्या बॅटरीचे आयुष्य वाढेल.

असे बरेच लोक आहेत जे फोन चार्जिंवर ठेवतात आणि तो वापरण्यास सुरुवात करतात. हे अजिबात करू नये. याचे कारण फोनच्या प्रोसेसरवर ताण येतो. फोन चार्ज करताना कंपनीकडून मिळालेला चार्जर वापरा. याशिवाय जर तुमचा चार्जर खराब झाला असेल तर तो बदलून घ्या.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.