Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राज्यातील ३७९ पोलिस निरीक्षकांच्या बदल्यासंग्राम शेवाळे, किरण चौगले यांची सांगलीला तर ईश्वर ओमासे, प्रकाश गायकवाड यांची बदली

राज्यातील ३७९ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या संग्राम शेवाळे, किरण चौगले यांची सांगलीला तर ईश्वर ओमासे, प्रकाश गायकवाड यांची बदली


मुंबई :  राज्यातील ३७९ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्याचे अपर पोलिस महासंचालक (आस्थापना) संजीव कुमार सिंघल यांनी रविवारी बदल्यांचे हे आदेश काढले आहेत. सांगलीत तत्कालीन कुपवाडचे प्रभारी सहायक निरीक्षक संग्राम शेवाळे यांची पुन्हा निरीक्षक म्हणून नागपूरहून सांगलीला बदली झाली आहे. तर किरण चौगुले नव्याने दाखल होणार आहेत. विश्रामबागचे प्रभारी ईश्वर ओमासे यांची सीआयडीकडे तर आटपाडीचे प्रभारी प्रकाश गायकवाड यांची मुंबई शहरकडे बदली करण्यात आली आहे. 

बदली झालेले अधिकारी कंसात कोठून कोठे बदली : स्वाती गायकवाड (कोल्हापूर ते नागरी हक्क संरक्षण), दिलीप घुगे (कोल्हापूर ते मिरा-भाईंदर-वसई-विरार), बबन जगताप (जळगाव ते पीटीसी तुरची), किरण चौगले (मुंबई ते सांगली), किरण लोंढे (मुंबई ते कोल्हापूर), विकास जाधव (पुणे ते पीटीसी तुरची), संदीप भागवत (सांगली ते मुंबई), राजेंद्र म्हस्के (सातारा ते मुंबई), नितीन माने (सातारा ते एसआयडी), हिम्मत माने-पाटील (पुणे ते पीटीसी तुरची), सचिन म्हेत्रे (गोंदिया ते सातारा), प्रमोद शिंदे (एसआयडी ते कोल्हापूर), सूरज मुलाणी (पीटीसी तुरची ते सोलापूर शहर), रविंद्रनाथ भंडारे (पीटीसी तुरची ते सोलापूर शहर), धनंजय मोरे (पीटीसी तुरची ते ठाणे), किरण रासकर (गोंदिया ते सांगली), सुशांत चव्हाण (एसीबी ते कोल्हापूर).

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.