Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पाऊसाळ्यात गाडीच्या काचेवर वाफ जमा होऊ नये म्हणून वापरा अशी ट्रिक

पाऊसाळ्यात गाडीच्या काचेवर वाफ जमा होऊ नये म्हणून वापरा अशी ट्रिक 


उन्हाळ्यात उकाड्याने हैराण झाल्यावर बरसणाऱ्या पावसाच्या सरी सुखावणाऱ्या वाटतात. उकाड्यापासून आराम मिळतो व सगळीकडे हिरवळ होते. पण सतत काही दिवस पाऊस पडला की तो नकोसा वाटू लागतो. चिखल आणि सततची रिपरिप यामुळे पावसाळ्याला लोक लवकर कंटाळतात.
पावसाळ्यात कार चालवताना खूप काळजी घ्यावी लागते. मुसळधार पाऊस असेल तर गाडी चालवणं जवळपास अशक्य होतं. तसेच या ऋतुत गाडीच्या विंडस्क्रीनवर वाफ जमा होते. ही वाफ घालवण्यासाठी एअर कंडिशनरचा योग्य वापर करणं महत्त्वाचं आहे. जर तुम्ही कारचा एसी नीट वापरला नाही तर तुमच्या कारच्या विंडस्क्रीनवर जास्त वाफ जमा होईल. यामुळे दृश्यमानता कमी होते व अपघात होण्याचा धोका असतो. त्यामुळे कारच्या आत एसी कसा वापरायचा ज्यामुळे ही वाफ नाहीशी होईल, त्याची योग्य पद्धत कोणती ते जाणून घेऊयात.
डिफॉग मोडचा वापर करा

बऱ्याच कारमध्ये डिफॉग मोड असतो, जो विंडस्क्रीनवरून वाफ काढण्यासाठी डिझाईन करण्यात आलं असतो. या मोडमध्ये एसी आणि हीटर दोन्हीचे संयोजन असते, जे हवा कोरडी करून विंडस्क्रीनवरून वाफ काढून टाकण्यास मदत करते.

एअर कंडिशनरचा वापर करा
एसी चालू करा, त्याला कूल मोडवर सेट करा आणि व्हेंट्स विंडस्क्रीनकडे डायरेक्ट करा. हे हवा कोरडी करून विंडस्क्रीनवरून वाफ काढून टाकण्यास मदत करेल.
रिसर्क्युलेशन मोड बंद करा

रिसर्क्युलेशन मोड बंद ठेवा, जेणेकरून ताजी हवा आत येऊ शकेल आणि ओलावा बाहेर जाऊ शकेल. रिसर्क्युलेशन मोड वाफ आणखी वाढवू शकतो. कधीकधी विंडस्क्रीनवरील वाफ हटवण्यासाठी हीटरचा देखील वापरला करता येऊ शकतो. तो विंडस्क्रीनच्या दिशेने डायरेक्ट करा, जेणेकरून गरम हवा ओलावा सुकवू शकेल.

खिडकी थोडी उघडा
जर परिस्थिती जास्तच खराब असेल, तर तुम्ही कारच्या खिडक्या थोड्याशा उघडू शकता, जेणेकरून आत आणि बाहेरील हवा एक्सचेंज होईल. यामुळे वाफही कमी होऊ शकते. विंडस्क्रीनवर 'डिफ्रॉस्टर स्प्रे' वापरा. हा स्प्रे वाफ कमी करण्यास मदत करतो आणि आपल्याला क्लिअर व्हिजन देतो. या टिप्स फॉलो करून, तुम्ही पावसाळ्यात तुमच्या कारच्या विंडस्क्रीनवर तयार होणारी वाफ घालवू शकता आणि सुरक्षित ड्रायव्हिंगचा अनुभव घेऊ शकता.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.