Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कर्करोग-थायरॉईडसाठी श्रीप्रिया पुरोहित यांचे संशोधन

कर्करोग-थायरॉईडसाठी श्रीप्रिया पुरोहित यांचे संशोधन


सांगली, ता. ३ : कर्करोग आणि थायरॉईडच्या निदानात उपयुक्त ठरणारे संशोधन येथील श्रीप्रिया किशनलाल पुरोहित यांनी केले आहे. नॅनोटेक्नॉलॉजी या विद्याशाखेत त्यांचे उच्चशिक्षण सुरू आहे. मुंबईतील ब्रीट आणि भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरमध्ये त्यांचे संशोधन कार्य सुरू आहे. मंगळूर विद्यापीठाच्या जैवविज्ञान विभागाच्यावतीने त्यांना पीएच. डी. पदवीने गौरवण्यात आले. यापुढे त्यांना भारत सरकारच्या संरक्षण आणि संशोधन विकास संस्थेच्या सेवेत त्यांना करिअरची संधी असल्याचे त्यांनी सांगितले. 
थायरॉईड व कर्करोग अशा रोगांच्या निदान आणि व्यवस्थापनासाठी उपयुक्त नॅनोपार्टिकल्सवर आधारित बायोमोलेक्युलर प्रोब्सचे संशोधन हा त्यांच्या पीएच.डी.चा विषय होता. मंगळूर विद्यापीठात २०१४ मध्ये त्यांची या संशोधनासाठी निवड झाली होती. या विद्यापीठांतर्गत असलेल्या स्वतंत्र संशोधन विभाग मुंबईत 'ब्रीट - बीएआरसी' मध्ये असून तेथेच त्यांनी हे संशोधन पूर्ण केले. त्यांना सीनिअर सायंटिस्ट डॉ. विजय कडवाड यांचे मार्गदर्शन मिळाले. डॉ. विजय कडवाड हे ब्रीट - बीएआरसी, वाशी कॉम्प्लेक्स येथील टीसीके - आरआयए विभागाचे डेप्युटी जनरल मॅनेजर असून ब्रीट दिल्ली, हैदराबाद आणि बंगळूर या प्रादेशिक केंद्रांचे प्रभारी आहेत. 
या संशोधनाचा उपयोग कर्करोग व थायरॉईड यांच्या प्रादुर्भाव झालेल्या स्थानांचे अचूक निदान करण्यासाठी होणार आहे. त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये एकूण पाच शोधनिबंध प्रसिद्ध केलेले आहेत. स्पेक्ट- एम आर आय तंत्रज्ञानासाठीही हे संशोधन उपयुक्त ठरणार आहे.

आयोडीन - १२५ व टेक्निशियम - ९९ एम हे रेडिओ आयसोटोप्स वापरून श्रीप्रिया यांनी हे संशोधन केले आहे. मूळच्या सांगलीच्या असलेल्या श्रीप्रिया यांचे प्राथमिक ते पदवीपर्यंतचे शिक्षण विलिंग्डन व कस्तुरबा वालचंद महाविद्यालयात झाले. त्यानंतर गुलबर्गा महाविद्यालयात त्यांनी एमएस्सी पदवी घेतली. तसेच मणिपाल विद्यापीठामध्ये जैवसूचना विज्ञानमध्ये प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे. वडील किशनलाल व आई माधुरी यांचे त्यांना प्रोत्साहन मिळाले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.