Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

खासदार विशालदादा पाटील यांची जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद व महानगरपालिका मध्ये आढावा बैठक

खासदार विशालदादा पाटील यांची जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद व महानगरपालिका मध्ये आढावा बैठक


सांगली- दि. ३:  सांगली लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार विशालदादा प्रकाशबापू पाटील यांनी लोकसभेचे विशेष अधिवेशन संपल्यावर लगेचच दुसत्या दिवशी सांगली जिल्ह्यातील तीन प्रमुख कार्यालयामध्ये आढावा बैठकीचे आयोजन केले आहे. सदरची बैठक जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद व महानगरपालिका या कार्यालयामध्ये होणार आहे. गुरुवार दिनांक ४ जुलै २०२४ रोजी दुपारी २.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्ह्यातील प्रमुख विभाग प्रमुख यांचे बरोबर आढावा बैठक होणार आहे. तसेच ५ जुलै २०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता जिल्हा परिषद येथे जिल्हा परिषद अंतर्गत सर्व विभागातील विभाग प्रमुखांच्या उपस्थित आढावा बैठक होणार आहे. आणि दुपारी २.३० वाजता सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका शहराशी संबंधित अनेक प्रश्नांवर सांगली महापालिका कार्यालय येथे महापालिकेच्या सर्व विभाग प्रमुखा बरोबर आढावा बैठक घेण्यात येणार आहे.

जनतेचे हिताचे प्रश्न तसेच सार्वजनिक कामांचा निपटारा होण्याच्या दृष्टीने अडचणी येऊ नये त्यासाठी खासदार विशालदादा पाटील यांनी सदरच्या आढावा बैठकीची आयोजन केले आहे. लोकसभा निवडणूकी मध्ये विशालदादा पाटील यांना चांगले मताधिक्य मिळाले आहे. जनसामान्य लोकांच्या मतांचा विचार करता जनतेचे हिताचे प्रश्न मार्गी लावणेकामी अशा आढावा बैठकीचे नियोजन होणे गरजेचे आहे. लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्यामध्ये अशा आढावा बैठकी मधून समन्वय निघून जनतेचे प्रश्न व लोकहिताचे सार्वजनिक कामे नक्कीच मार्गी लागू शकतात.

जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व आयुक्त महानगरपालिका यांनी या आढावा बैठकीबाबत खासदार यांचे पत्र मिळताच सर्व विभाग प्रमुखांना आढावा बैठकीबाबत उपस्थित राहणे बाबत कळविलेले आहे. खासदार विशालदादा पाटील यांच्या पहिल्याच आढावा बैठकीच्या नियोजनामधून जिल्ह्यात चांगलीच चर्चा होत आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.