Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सावधान! तुम्ही रात्री उशीरापर्यंत मोबाईल पाहताय? वेळीच सावध व्हा, अन्यथा......

तुम्ही रात्री उशीरापर्यंत मोबाईल पाहताय? वेळीच सावध व्हा, अन्यथा......


सध्या चुकीची जीवन आणि आहारशैलीमुळे लोकांना आरोग्याच्या अनेक समस्यांना समोरे जावे लागत आहे. यात गंभीर अशा मधुमेहाची समस्या झपाट्याने वाढत आहे. अयोग्य आहार, ताणतणाव, अनुवांशिक कारणे आणि झोपेचा अभाव मधुमेहाची समस्या वाढण्यास प्रामुख्याने कारणीभूत ठरते.
त्यामुळे जीवनशैली सुधारण्यासह पुरेशी झोप घेण्याचा सल्ला दिला जातो. शरीर आणि निरोगी मनासाठी झोप खूप गरजेची आहे. त्यामुळे दररोज 7 ते 9 तासांची झोप घेतली पाहिजे. परंतु आजकाल लोकांमध्ये मोबाईलचा वापर वाढला आहे. अनेक जण रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरतात. तुम्हीही रात्री उशीरापर्यंत मोबाईल वापरत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. या लेखात आपण रात्री उशिरापर्यंत मोबाईल पाहिल्याने आरोग्यावर काय परिणाम होतो ते जाणून घेऊया. 

झोपेच्या कमतरतेमुळे मधुमेहाचा धोका
मानवी आरोग्यासाठी पुरेशी झोप महत्त्वाची आहे. कमी झोप घेतल्याने रक्तातील साखरेच्या पातळीवर नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे झोप ही प्रत्येकासाठी अन्न आणि व्यायामाइतकीच महत्त्वाची आहे. जर कोणी खूप कमी झोप घेत असेल तर त्याला आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. यात प्रमुख्याने शरीरावर ताण येतो आणि त्यामुळे कॉर्टिसोल हार्मोन तयार होण्यास सुरुवात होते. या हार्मोनमुळे शरीरातील इंसुलिन प्रतिरोधक क्षमता वाढून रक्तातील साखरेची पातळी वाढते.
या लोकांना असतो सर्वाधिक धोका

वैद्यकीय अहवालानुसार, जे लोक दररोज 7 ते 8 तास झोप घेताता त्यांच्या तुलनेत 5 तास झोपणाऱ्यांना मधुमेहाचा जास्त धोका असतो. यासह त्यांना हृदयाच्या समस्या, तणाव आणि इतर अनेक गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे पूरेशी झोप घ्यावी, असा सला आरोग्य तज्ज्ञांकडून कायम दिला जातो. 

मधुमेह टाळण्यासाठी या गोष्टी लक्षात घ्या
ICMR च्या संशोधनानुसार, भारतात दशलक्षांपेक्षा जास्त लोकांना मधुमेहाची समस्या आहे. शहरी भागात याचे प्रमाण जास्त आहे. कारण, शहरी भागातील लोकांना काम, तणाव, आर्थिक दबाव आणि मोबाईल, सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे अनेकांना झोपेची समस्या निर्माण होते. ही समस्या मधुमेहास आमंत्रण ठरते.

चांगल्या झोपेसाठी पाळ या आरोग्यासाठी झोप जेवढी महत्त्वाची आहे तेवढेच वेळेत उठणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे सकाळी लवकर उठण्याची सवय लावा.

- निरोगी शरिरासाठी दिनचर्येत व्यायामाचा समाविष्ट करा. तसेच योग्य आणि सकस आहार घ्या. रात्रीचे जेवण वेळेवर करा आणि लवकर झोपा.

- हल्ली रात्री उशीरापर्यंत झोप न लागण्याची समस्या अनेकांना निर्माण होत आहे. सा समस्येला करणीभूत असलेल्या गोष्टींमध्ये प्रमुख्याने मोबईचा अतिवापर हे प्रमुख कारण ठरत आहे. त्यामुळे गॅझेट्सपासून शक्य तितके अंतर ठेवा. 
(टीप: वरील लेख हा सामान्य माहितीवर आधारित आहे. सांगली दर्पण या माहितीचे समर्थन करत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी किंवा अधीक माहितीसाठी संबंधित तज्ञांचा सल्ला आवर्जून घ्या.)

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.