Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अल्पवयीन मुलीवर ४ वर्षे बलात्कार; माजी आमदार अटकेत, गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीवर ४ वर्षे बलात्कार; माजी आमदार अटकेत, गुन्हा दाखल

कुर्नूल : एका अल्पवयीन मुलीवर चार वर्षांहून अधिक काळ वारंवार बलात्कार केल्याच्या आरोपाखाली आंध्र प्रदेश पोलिसांनी वायएसआर काँग्रेस पक्षाचे माजी आमदार जे सुधाकर यांना अटक केली आहे. कोडुमुरूचे माजी आमदार सुधाकर (५०) यांना १७ वर्षीय तरुणीच्या तक्रारीनंतर गुरुवारी अटक करण्यात आली. मुलीने पोलिसांना 'व्हिडीओ पुरावा'ही दिला आहे. 

आमदाराने त्याच्या घरात आईवडिलांसोबत कामगार म्हणून काम करत असलेल्या अल्पवयीन मुलीवर २०१९ ते २०२३ पर्यंत अनेकवेळा बलात्कार केला, असे पोलिस अधिकारी विजय शेखर रेड्डी यांनी सांगितले. पोलिसांनी माजी आमदाराला भारतीय न्याय संहिता (बीएनएस) च्या कलम ३७६ आणि ५०६ तसेच लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पोस्को) कायद्यांतर्गत अटक केली आहे.

सरकार पडले अन्...

टीडीपीच्या नेतृत्वाखालील नवीन सरकार स्थापन होण्यापूर्वी, मुलीवर अत्याचार झाल्याचा व्हिडीओ समोर आला होता, मात्र तत्कालीन आमदाराविरुद्ध तक्रार करण्यासाठी कोणीही पुढे आले नव्हते. मात्र, नवीन सरकार आल्यानंतर मुलीने हिंमत दाखवत गुरुवारी आमदाराविरोधात तक्रार दाखल केली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.