Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

३५ हजारांची लाच स्वीकारताना वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला एसीबीने पकडले !

३५ हजारांची लाच स्वीकारताना वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला  एसीबीने पकडले !


मुंबई : शहरातील टिळकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दीपक बागुल यांना ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सोमवारी रंगेहाथ अटक केली. एसीबी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार बागुल यांनी तक्रारदाराकडे एक लाख रुपयांची लाच मागितली होती. मात्र तडजोड करून ३५ हजार रुपये स्वीकारण्यास ते तयार झाले.

या प्रकरणातील तक्रारदाराने ठराविक मुदतीत पैसे दुप्पट करण्यासाठी ओळखीतल्या एका महिलेच्या पतसंस्थेत २७.५० लाख रुपये जमा केले होते. मात्र ही योजना फसली आणि महिला १० लाख रुपयेच परत करू शकली. उर्वरित १७.५० लाख रुपये परत मिळवण्यासाठी तक्रारदाराने तगादा लावताच महिलेने त्याच्या विरोधात उलटी तक्रार केली. चौकशी करण्यासाठी तक्रारदारास पोलीस ठाण्यात बोलावून घेण्यात आले. तेव्हा उर्वरित रक्कम मिळवून देतो, त्याबदल्यात एक लाख रुपये द्यावे लागतील, अशी मागणी बागुल यांनी केली. बागुल यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने एसीबीकडे याबाबत तक्रार दिली. एसीबीने तक्रारीची खातरजमा केली आणि सापळा रचला.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.