Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

इस्रो प्रमुख सोमनाथ यांचा पृथ्वीवासीयांना मोठा इशारा

इस्रो प्रमुख सोमनाथ यांचा पृथ्वीवासीयांना मोठा इशारा


एक 370 मीटर व्यासाचा लघुग्रह पृथ्वीजवळून जाणार आहे. हा ग्रह पृथ्वीला धडकण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. यापूर्वी ३० जून १९०८ रोजी सायबेरियातील तुंगुस्का नावाच्या एका दुर्गम भागात, अशाच एका लघुग्रहाच्या धडकेमुळे झालेल्या मोठ्या स्फोटात सुमारे २२०० चौरस किलोमीटर एवढे घनदाट जंगल उद्ध्वस्त झाले होते.
या घटनेत 8 कोटी झाडे नष्ट झाली होती. आता जो लघुग्रह पृथ्वीच्या जवळ येत आहे, तो १३ एप्रिल २०२९ रोजी जवळून जाण्याची शक्यता आहे. असेही म्हटले जाते की, असे लघुग्रह जेव्हा पृथ्वीवर आदळतात तेव्हा अनेक प्रजाती नामशेष होतात. अशाच एका घटनेमुळे पृथ्वीवरून डायनासोर नामशेष झाल्याचे मानले जाते.
काय म्हणाले एस सोमनाथ -

सोमनाथ म्हणाले, "आपला जीवनकाळ साधारणपणे 70 ते 80 वर्षांचा आहे आणि आपण आपल्या आयुष्यात अशी खुठल्याही प्रकारची आपत्ती बघत नाही. यामुळे असे घडूच शकत नाही, असे आपल्याला वाटते. जगाचा आणि विश्वाचा इतिहास पाहिला, तर मी लघुग्रह शुमेकर-लेव्हीला धडकल्याचे बघितले आहे. जर पृथ्वीवर अशी घटना घडली तर आपण सर्व नामशेष होऊ.

यासाठी इतर देशांसोबत संयुक्तपणे काम करणेही आवश्यक -
याच बरोबर, "ही वास्तविक शक्यता आहे. आपण स्वतःला तयार करायला हवे. पृथ्वीवर असे काही घडू नये, अशीच आपली सर्वाची इच्छा आहे. मानवासह सर्व जीवांनी येथे राहायला हवे. मात्र, आपण हे रोखू शकत नाही. यासाठी आपल्याला पर्याय शोधावे लागतील. आपण पृथ्वीजवळ येणारा लघुग्रह शोधू शकतो आणि तो दूर करू शकतो. मात्र, कधीकधी हे अशक्यही होऊ शकते. यामुळे तंत्रज्ञान विकसित करण्याची आवश्यकता आहे. अंदाज बांधण्याची क्षमता वाढविण्याची आवश्यकता आहे. याशिवाय, यासाठी इतर देशांसोबत संयुक्तपणे काम करणेही आवश्यक आहे," असेही सोमनाथ म्हणाले. जागतिक लघुग्रह दिनानिमित्त (३० जून) इस्रोने आयोजित केलेल्या कार्यशाळेत सोमनाथ बोलत होते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.