Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'त्या' बकरीच्या पिल्लाला पहायला अख्खं गाव लोटलं, नेमकं असं काय घडलं ? व्हिडिओ पहा

'त्या' बकरीच्या पिल्लाला पहायला अख्खं गाव लोटलं, नेमकं असं काय घडलं ? व्हिडिओ पहा


जगात अनेक आश्चर्य घडत असतात, काहींचं लॉजिक समजतं पण काहीमागचं कारण समजूच शकत नाही. अशावेळी ती आश्चर्यकारक घटना पाहून लोक अचंबित होतात. अशीच एक आश्चर्यकारक घटना चंद्रपूर जवळच्या गावात घडली आहे. तेथे एका बकरीच्या पिल्लाला अख्खं गाव लोटलं आहे. असं काय खास आहे त्या पिल्लामध्ये असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना ? तर हे पिल्लू होतं बकरीचं पण त्याचा चेहरा होता माणसासारखा… मनुष्याचा चेहरा घेऊन जन्मलेल्या त्या पिल्लाला पाहण्यासाठी गावातील नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.


चंद्रपूर जिल्ह्यातील चेक बेरडी गावात एका शेतकऱ्याच्या घरी ही घटना घडली आहे. त्याच्याकडे असलेल्या बकरीला दोन पिले झाली. त्यातील एक पिल्लू तर इतरांसारख सामान्य होतं. मात्र दुसरे पिलू सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. त्याचं कारण म्हणजे ते बकरीचं पिल्लू इतर पिल्लांसारखं नव्हे तर एखाद्या वृद्ध माणसासारखे दिसत होते. दाढी, माणसासारखे डोळे चेहरा असलेले हे बकरीचे पिल्लू जन्मताच अतिशय नाजूक होते. त्याला पाहण्यासाठी खूप गर्दी झाली होती. अख्खं गाव लोटलं.

मात्र हे पिलू अतिशय नाजूक होतं, आत्राम परिवाराने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात त्यांना यश आले नाही. एखाद्या वृद्ध माणसासारखा चेहरा असलेले हे पिल्लू बघण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांची तोबा गर्दी उसळली. मात्र हे कोणतंही आश्चर्य नव्हे तर केवळ जनुकीय बदलाचा परिणाम आहे, असे तज्ञांनी सांगितलं. या पिल्लाच्या मृत्यूनंतर गावातच खड्डा खणून आत्राम परिवाराने हे विचित्र पिल्लू पुरले. या दाढी असलेल्या व माणसासारखा चेहरा असलेल्या पिलाची मात्र सध्या मोठीच चर्चा सुरू आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.