Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कोल्हापूर :-डोळ्यासमोर दोन्ही मुलं गमावली, अस्थीविसर्जना आधीच आईचा मृत्यू

कोल्हापूर :-डोळ्यासमोर दोन्ही मुलं गमावली, अस्थीविसर्जना आधीच आईचा मृत्यू 


कोल्हापूर : दोन्ही पोटची मुलांच्या अस्थि विसर्जनाआधीच आईचाही मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना कोल्हापूरमध्ये घडली आहे. दोन पोटच्या मुलांचा शेतात काम करत असताना विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला, हा विरह सहन न झालेल्या आईचेही हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं आहे.

कोल्हापूरच्या शाहूवाडी तालुक्यातील कोपर्डे गावातील घटनेने सगळीकडे हळहळ व्यक्त होत आहे. बुधवारी शेतात पिकांना खतं टाकण्याचं काम सुरू असताना तुटलेल्या विजवाहिनीचा स्पर्श होऊन सुहास आणि स्वप्निल पाटील या दोन्ही सख्ख्या भावांचा मृत्यू झाला. एकमेकांना वाचवताना दोघांनाही जीव गमवावा लागला होता.

स्वप्निल आणि सुहास यांच्या अस्थि विसर्जनाचा विधी आज होता, पण त्याआधीच त्यांची आई नंदाताई यांना हृदयविकाराचा धक्का आला. हातातोंडाशी आलेल्या मुलांच्या आकस्मित मृत्यूचा जबर धक्का आईला बसला होता, त्यातून त्या सावरल्या नाहीत आणि यातच त्यांचाही मृत्यू झाला. एकाच घरातल्या तिघांच्याही मृत्यूमुळे शाहूवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.