Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीचे फायर स्टेशन की चार्जिंग स्टेशन? पार्किंग बनले चार्जिंग स्टेशन! आयुक्त लक्ष देणार का?

सांगलीचे फायर स्टेशन की चार्जिंग स्टेशन? पार्किंग बनले चार्जिंग स्टेशन! आयुक्त लक्ष देणार का?


सांगली :- सांगली फायर स्टेशन मध्येच चार्जिंग स्टेशन झाले आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.वरीष्ठ अधिकारी कारवाई करणार का? फायर स्टेशन आता इलेक्ट्रिक वाहनांचे चार्जिंग स्टेशन बनल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. फायर स्टेशनच्या पार्किंगमध्येच इलेक्ट्रिक वाहने चार्ज केली जात असल्याचे दिसून आले आहे. बेकायदेशीररित्या शासकीय कार्यालयात वाहने चार्जिंग करणाऱ्यांवर वरीष्ठ अधिकारी कारवाई करणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

प्रदुषण मुक्तीसाठी इलेक्ट्रिक वाहने वापरण्याबाबत शासनाकडून प्रसार, प्रचार केला जात आहे. नागरिकांना अशी वाहने घेण्यासाठी प्रवृत्तही केले जात आहे. पारंपरिक इंधनावरील वाहनांपासून होणारे प्रदुषण रोखण्यासह मर्यादित इंधना साठ्याला पर्याय म्हणून इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढला आहे. नागरिकांनीही आता मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहने खरेदी केली आहेत. 

मंगळवारी दुपारी सांगलीतील फायर स्टेशन मध्ये एक अजबच प्रकार उघडकीस आला. येथील फायर स्टेशन पार्किंगमध्ये चक्क एक दुचाकी चाजिर्गला लावल्याचे दिसून आले. दुचाकी चालकांनी कार्यालयिन प्रमुखांची याबाबत परवानगी घेतली होती की नाही हे समजू शकले नाही. वाहनांचे चार्जिंग करणाऱ्या संबंधितांवर वरीष्ठ अधिकारी कारवाई करणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.