Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रूग्णालयाच्या अधिष्ठातापदी डॉ.पी. डी . गुरव

मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रूग्णालयाच्या अधिष्ठातापदी डॉ.पी. डी . गुरव


सांगली :  मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयाचे अधिष्ठाता म्हणून डॉ . पी. डी . गुरव यांनी नुकताच पदभार घेतला. मिरज शासकीय महाविद्यालयातच डॉ.गुरव यांचे वैद्यकीय शिक्षण झाले आहे. शिवाय ते मूळचे सांगली जिल्ह्यातीलच आहे. डॉ . गुरव यांची अधिष्ठातापदी नियुक्ती झाल्याने मिरज आणि सांगलीतील पद्मभूषण वसंतदादा पाटील रूग्णालयात चांगली सेवा मिळेल अशी अपेक्षा रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांकडून व्यक्त केली जात आहे. 

डॉ . गुरव यांनी यापूवीर् सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदगर् जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अधिष्ठाता म्हणून काम पाहिले आहे. जनरल सजर्रीमध्ये त्यांनी मास्टसर् केले आहे. विविध महाविद्यालयातील त्यांच्या अनुभवाचा फायदा सांगली आणि मिरजेतील रूग्णांना मिळणार आहे. त्यांनी सवार्धिक काळ मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध पदांवर काम केले आहे. 
यापूवीर्च्या अधिष्ठातांच्या कायर्काळात सांगली आणि मिरज येथील रूग्णालयाच्या सेवेत विस्कळीतपणा आला होता. या दोन्ही रूग्णालयातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. मिरज महाविद्यालयाशी संलग्न असूनही तत्कालीन अधिष्ठातांनी सांगलीच्या रूग्णालयाकडे नेहमीच दुलर्क्ष केले. ते सांगलीच्या रूग्णालयाकडे फिरकतच नव्हते. त्यामुळे सांगलीतील रूग्णालयाचा कारभार रामभरोसे होता. शिवाय त्या अधिष्ठातांच्या कायर्काळात औषध खरेदी, वैद्यकीय साहित्य खरेदीत घोटाळे केल्याची चर्चा त्यांच्या निवृत्तीनंतर सिव्हील हॅस्पिटलच्या वतुर्ळात होत आहे. आता मूळच्या सांगलीच्याच डॉ . गुरव यांची अधिष्ठातापदी नियुक्ती झाल्याने दोन्ही रूग्णालयाचा कारभार सुधारेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.