Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भातावर एक चमचा तूप घालून खाणे योग्य की अयोग्य? शुगर रुग्णांसाठी ठरेल कां धोक्याची घंटा? काय सांगतात तज्ञ

भातावर एक चमचा तूप घालून खाणे योग्य की अयोग्य? शुगर रुग्णांसाठी ठरेल कां धोक्याची घंटा? काय सांगतात तज्ञ 


आपल्यातील अनेक जणांना भात खाल्ल्याशिवाय जेवल्यासारखं वाटत नाही. पण, भातामुळे मधुमेह वाढेल या भीतीने जगभरातील मधुमेही रुग्णांना त्यांच्या नियमित आहारात भाताचा समावेश करण्यासंदर्भात सावधानतेचा इशारा दिला जातो.
पण, जर आम्ही तुम्हाला सांगितले की, यातूनसुद्धा एक मार्ग निघू शकतो तर… भातप्रेमींनो, आम्हाला यावर एक खास ट्रिक सापडली आहे; जी मधुमेहाचा सामना करण्यासाठी तुम्हाला मदत करू शकते. ही ट्रिक ऐकून आम्हीदेखील थक्क झालो. याबाबत अधिक जाणून घेण्यासाठी दी इंडियन एक्स्प्रेसने तज्ज्ञांशी संवाद साधला आणि ही ट्रिक कोणती, कशा पद्धतीने कार्य करेल, यादरम्यान कोणते तोटे उदभवू शकतात हे त्यांनी समजावून सांगितले आहे.
एमआरसी आणि पी. डी. हिंदुजा हॉस्पिटलच्या आहारतज्ज्ञ स्वीडल त्रिनिडेड म्हणाल्या, "भातात तूप घातल्याने जेवणाचा ग्लायसेमिक इंडेक्स तात्त्विकदृष्ट्या सुधारतो; पण ग्लायसेमिक भार वाढतो." त्यांच्या मते, तुपात फॅटी ॲसिडचे घटक असतात; जे कार्बोहायड्रेट्सचे पचन मंद करून, रक्तातील साखरेची पातळी कमी करते. तर भातात तूप मिसळल्याने त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी होऊ शकतो; ज्यामुळे तो उर्जेचा स्रोत ठरू शकतो.
तूप हा चरबीमध्ये विरघळणाऱ्या ए, डी, ई व के या जीवनसत्त्वांनी समृद्ध आहे; जे भाताबरोबर खाल्लेल्या इतर पदार्थांमधील पोषक घटकांचे शोषण वाढवू शकते. तुपामध्ये Butyrate, एक शॉर्ट-चेन फॅटी ॲसिडदेखील आहे; जे आतड्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. निरोगी आतडे तुमचे चयापचय आरोग्य सुधारू शकते; ज्यामुळे अप्रत्यक्षपणे रक्तातील साखरेच्या व्यवस्थापनास फायदा होतो, असे बंजारा हिल्स, हैदराबाद येथील केअर हॉस्पिटलच्या क्लिनिकल डाएटीशियन सुषमा यांनी सांगितले आहे.

या ट्रिकला सगळ्यांनी फॉलो करावे का?
क्लिनिकल डाएटीशियन सुषमा म्हणाल्या की, हे सर्वांसाठी योग्य असू शकत नाही; विशेषतः ज्यांना अनियंत्रित मधुमेह आहे. तुपात चरबीचे प्रमाण जास्त असते; ज्यामुळे लोक उच्च कोलेस्ट्रॉल किंवा हृदयाच्या आरोग्याशी संबंधित समस्यांना बळी पडतात, असे स्वीडल त्रिनिडेड म्हणाले आहेत. भातात तूप घातल्याने कॅलरीजचे प्रमाण वाढते. मग संभाव्य वजन व्यवस्थापनात आणि तुमच्या कॅलरीज बर्न करण्यामध्येही अडथळे निर्माण होतात.

तसेच हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी समस्या असलेल्या लोकांनी सावधगिरी बाळगली पाहिजे कारण- तुपाचे जास्त सेवन त्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. ज्या लोकांना दुग्धजन्य पदार्थांची ॲलर्जी आहे, त्यांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. कारण- तूप हा दुग्धजन्य पदार्थ आहे. तसेच भातात तूप घालण्याचे प्रमाणही ठरवले पाहिजे. एक मार्गदर्शक तत्त्व म्हणजे शिजवलेला भात ताटात वाढताना एक चमचा तूप घालणे (शिजविलेला भात सुमारे १/२ कप ) असे डाएशियन सुषमा म्हणाल्या आहेत. तर, संतुलित आहार आणि नियमित व्यायामासाठी तूप हा पर्याय नाही हे लक्षात घेणे आवश्यक आहे. मधुमेहाचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि तुमच्या आहारात तूप समाविष्ट करण्याबाबत आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्या, असे आहारतज्ज्ञ स्वीडल म्हणाल्या आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.