Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

लग्नाला आला आहेस की, ड्युटीवर? मंत्र्याच्या पत्नीनें पोलीस अधिकाऱ्याला झापलं

लग्नाला आला आहेस की, ड्युटीवर? मंत्र्याच्या पत्नीनें पोलीस अधिकाऱ्याला झापलं 


मागच्या महिन्यात देशात लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. केंद्रात पुन्हा एकदा मोदी सरकार स्थापन झालय. त्याचवेळी काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकालही लागले. केंद्रात मोदी सरकारने सत्ता टिकवली पण आंध्र प्रदेशात मात्र सत्ता बदल झाला.
तिथे जगनमोहन रेड्डी यांचं सरकार जाऊन चंद्राबाबू नायडू पुन्हा सत्तेवर आले. आता चंद्राबाबू नायडू सरकारमधील एका मंत्र्याच्या पत्नीमुळे वाद निर्माण झाला आहे. मंत्री मंडीपाल्ली रामाप्रसाद यांच्या पत्नीच्या कृतीमुळे हा वाद निर्माण झालाय. सोशल मीडियावर या प्रसंगाचा व्हिडिओ व्हायरल होतोय. एका कार्यक्रमाला जाताना पोलीस अधिकाऱ्यामुळे थांबून रहाव लागल्याने या मंत्र्याच्या पत्नीने त्या अधिकाऱ्याला झापलं. मूळात तिला तो अधिकारच नाहीय.
अन्नामय्या जिल्ह्यात ही घटना घडली. हरीता रेड्डी एका स्थानिक कार्यक्रमासाठी चालल्या होत्या. कारच्या पुढच्या सीटवर त्या बसल्या होत्या. रमेश नावाच्या पोलीस इंस्पेक्टरला त्या झापत असल्याच व्हिडिओमध्ये दिसतय. या पोलीस इंस्पेक्टरमुळे अर्धातास थांबून रहाव लागलं, असं हरीता रेड्डी यांचा दावा आहे. तिने त्या इंस्पेक्टरला अनेक प्रश्न विचारले. त्याच्या वर्तनावर संताप, असमाधान व्यक्त केलं.

तो इंस्पेक्टर सॅल्यूट करतो, आणि….
“सकाळ झाली नाही का? कुठली परिषद होती तुझी? लग्नाला आलायस की, ड्युटीवर? तुझ्यासाठी अर्धातास थांबून रहाव लागलं. तुला पगार कोण देतो? सरकार की, YSRCP?” अशा शब्दात मंत्र्यांच्या पत्नीने त्या पोलीस इंस्पेक्टरला झापलं. तो शांतपणे तिथे उभ राहून हे सर्व ऐकत होता. व्हिडिओच्या शेवटी तो इंस्पेक्टर हरीता रेड्डीला सॅल्यूट करतो. तिच्या निर्देशानुसार ताफ्याच नेतृत्व करण्यासाठी पुढे निघून जातो.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.