Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

FSSAI नं भारतात सफरचंदावर घेतलीय बंदी :, 'हे' फळ आरोग्यासाठी हानिकारक

FSSAI नं भारतात सफरचंदावर घेतलीय बंदी :, 'हे' फळ आरोग्यासाठी हानिकारक 


आरोग्यासाठी ताजी फळं उपयुक्त असतात. सफरचंदही आरोग्यदायी असतात. सध्याच्या काळात फळं लवकर परिपक्व व्हावीत म्हणून रसायनांचा वापर केला जातो. अशा फळांमुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. याला सफरचंदंदेखील अपवाद नाहीत. सफरचंद पिकवण्यासाठी, तसंच ते लालचुटूक दिसावं यासाठी काही मसाल्यांचा वापर केला जातो. भारतीय अन्न सुरक्षितता आणि मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) अशी लाल सफरचंदं खरेदी न करण्याचा सल्ला दिला असून, या सफरचंदांवर बंदी घातली आहे. नेमकी कोणती सफरचंदं खरेदी करावीत, सफरचंदं खरेदी करताना काय काळजी घ्यावी, याबाबत प्राधिकरणाने मार्गदर्शन केलं आहे. याबाबत सविस्तर जाणून घेऊ या.

खराब झालेली सफरचंदं चमकदार दिसावीत यासाठी मेणासारख्या पदार्थाचा वापर केला जातो. यापेक्षादेखील एक घटक जास्त धोकादायक असतो. हा घटक सफरचंदामध्ये असू शकतो. एफएसएसएआयने त्यावर बंदी घातलेली आहे. तरीदेखील काही जण सफरचंदं पिकवण्यासाठी त्या घटकाचा वापर करतात. लाल सफरचंदं खरेदी करत असाल तर तसं करू नका. कारण या सफरचंदांमुळे कॅन्सरचा धोका वाढतो. कारण ही सफरचंदं पिकवण्यासाठी ज्या मसाल्यांचा वापर केला जातो, ते शरीरासाठी हानिकारक असतात. त्यामुळे त्यावर बंदी घालण्यात आली आहे. या रसायनाचा वापर करून पिकवलेलं सफरचंद कॅन्सरपेक्षाही जास्त धोकादायक असतं. सायन्स डायरेक्टवरील एका संशोधनानुसार, दीर्घ काळ आणि जास्त प्रमाणात असं सफरचंद खाल्लं तर कॅन्सर, डायबेटीस, इन्फ्लेमेशन आणि अवयव निकामी होण्याचा धोका वाढतो.
मागणीनुसार पुरवठा करण्यासाठी रसायनांचा वापर करून फळं पिकवली जातात. एफएसएसएआयने काही रसायनांवर बंदी घातली आहे. त्यात कॅल्शियम कार्बाइड आणि त्यातून बाहेर पडणाऱ्या अॅसिटिलीन गॅसचा समावेश आहे. यामुळे पिकलेलं सफरचंद लाल दिसतं; पण ते आरोग्यासाठी नुकसानकारक असतं. तसंच सफरचंदं चांगली दिसावीत, यासाठी त्यावर मेणासारखा पदार्थ लावला जातो. 

हाआरोग्यासाठी नुकसानकारक असतो. सफरचंदाला हा पदार्थ लावला आहे की नाही हे ओळखण्यासाठी सफरचंद दहा सेकंद पाण्यात बुडवून ठेवावं. त्यानंतर कोरड्या चाकूनं त्याची साल थोडी काढा. साल काढत असताना त्यावर पांढऱ्या रंगाचा पातळ थर निघाला, तर ते मेण असू शकतं. सफरचंद कृत्रिमरीत्या पिकवणं पूर्णपणे प्रतिबंधित आहे असं नाही. यासाठी एथिलीन गॅसचा वापर करता येतो. त्यासाठी एफएसएसएआयने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत; मात्र या वायूचा जास्त वापर करता येत नाही.

सफरचंद खरेदी करत असाल तर सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. नैसर्गिकरीत्या पिकवलेली फळं खरेदी करावीत. जो विक्रेता जाणकार आहे आणि रसायनविरहित फळं विकण्याचा दावा करतो, त्याच्याकडून फळं खरेदी करा. एफएसएसएआयने सांगितलं, की सालावर काळे डाग असतील तर असं सफरचंद खरेदी करू नये. कारण ते रसायनांच्या मदतीने पिकवलेलं असू शकतं. सफरचंद किंवा अन्य कोणतंही फळ खाण्यापूर्वी स्वच्छ धुऊन घ्यावं. यासाठी वाहत्या पाण्याचा वापर करावा. फळं धुताना घासून घ्यावीत. यामुळे त्यावरची घाण आणि घातक रसायनं निघून जातात. कोणतंही फळ खाण्यापूर्वी ते स्वच्छ करून घ्या.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.