Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

HIV झाल्यानंतर किती काळ जगू शकते व्यक्ती? हा आजार पूर्ण बरा होतो का?

HIV झाल्यानंतर किती काळ जगू शकते व्यक्ती? हा आजार पूर्ण बरा होतो का?


मुंबई : शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये एड्सची गंभीर प्रकरणे दिसून आली आहेत. त्रिपुरात 828 विद्यार्थी एचआयव्ही बाधित आढळले, असून त्यापैकी 47 विद्यार्थ्यांचा या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. हा अहवाल समोर येताच खळबळ उडाली, त्यानंतर राज्य सरकारने स्पष्टीकरण देताना ही आकडेवारी 25 वर्षे जुनी असल्याचे सांगितले. अशा परिस्थितीत 47 मुलांचा मृत्यू कसा झाला आणि एचआयव्ही पॉझिटिव्ह झाल्यानंतर माणूस किती काळ जिवंत राहू शकतो, असा प्रश्न उपस्थित होतो.

आम्ही तुम्हाला सांगतो की जेव्हा एखाद्या व्यक्तीला एचआयव्हीची लागण होते, तेव्हा विषाणूचा भार खूप वाढतो, अशा परिस्थितीत ती व्यक्ती सहजपणे इतरांना एचआयव्ही संक्रमित करू शकते. दुसरीकडे, एचआयव्हीग्रस्त व्यक्तीला उपचार न मिळाल्यास तो जास्तीत जास्त ३ वर्षे जगू शकतो. पण जर त्याला उपचार मिळाले तर तो निरोगी आयुष्य जगू शकतो, पण औषध आयुष्यभर घ्यावे लागते.

एचआयव्हीचा प्रसार कसा होतो?

एचआयव्ही पसरण्याचे मुख्य कारण म्हणजे एचआयव्ही बाधित पुरुष किंवा स्त्री एकमेकांच्या संपर्कात येणे. त्याच वेळी, जर एखाद्या व्यक्तीला एचआयव्ही बाधित व्यक्तीचे रक्त दिले किंवा इंजेक्शन दिले गेले, तर दुसरी व्यक्ती देखील एचआयव्ही बाधित होऊ शकते. एकाच इंजेक्शनचा वापर अनेकांनी केला तरीही याचा धोका असतो.

विद्यार्थ्यांमध्ये संसर्ग कसा पसरला?
त्रिपुरा एड्स कंट्रोल सोसायटी (TSACS) च्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की एचआयव्ही प्रकरणांमध्ये वाढ हे विद्यार्थ्यांमधील अंमली पदार्थांच्या सेवनामुळे असू शकते.

TSACS ने अंदाजे 220 शाळा आणि 24 महाविद्यालये आणि विद्यापीठांमधील विद्यार्थी ओळखले आहेत जे ड्रग्स शरिरात टोचतात.

TSACS च्या संयुक्त संचालकांनी दिलेल्या माहितीनुसार, "आतापर्यंत, 220 शाळा आणि 24 महाविद्यालये आणि विद्यापीठे अशी ओळखली गेली आहेत जिथे विद्यार्थी अंमली पदार्थांचे सेवन करत असल्याचे आढळले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.