Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

लग्नास नकार दिल्याने महिला डॉक्टरनें नगरसेवकाचे लिंगच कापले, कथीत Live - in Relationship चा कठोर अंत

लग्नास नकार दिल्याने महिला डॉक्टरनें नगरसेवकाचे लिंगच कापले, कथीत Live - in Relationship चा कठोर अंत 


एकतर्फी प्रेम किंवा प्रेमसंबंधात राहून पुढे विवाहास नकार दिल्याने महिलांवर पुरुषांद्वारे होणारे हल्ले हा देशभरात चिंतेचा विषय आहे. पण आता महिलांकडून पुरुषांवर होणारे हल्ले, हा देखील चिंतेचा विषय ठरु पाहात आहे. बिहार येथील छपरा  जिल्ह्यातून अशीच एक धक्कादायक घटना पुढे आली आहे. ज्यामध्ये डॉक्टर  असलेल्या एका महिलेने नगरसेवक  असलेल्या तिच्या बॉयफ्रेंडचे गुप्तांग  कापले आहे. सदर महिला डॉक्टर आणि पीडित तरुण हे पाठिमागील प्रदीर्घ काळापासून  लिव्ह इन रिलेशनशिप  मध्ये होते. दरम्यान, तरुणाकडून विवाहास आलेल्या नकारामुळे संतापलेल्या महिलेने हे कृत्य केल्याचे समजते.

जखमी नगरसेवक रुग्णालयात दाखल
डॉक्टर महिला ही छापरा जिल्ह्यातील मढौरा येथील नर्सींग होमची संचालिका आहे. अभिलाषा गुप्ता असे तीचे नाव आहे. तिने तिचा नगरसेवक असलेला कथीत प्रियकर वेदप्रकाश सिंह  याचे लिंग चाकूने कापले. ही घटना सोमवारी घडली. लिंग कापले गेल्यामुळे वेदप्रकाश वेदनेने तळमळू लागला. परिणामी आजूबाजूचे लोकही त्याच्या मदतीला धावले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमी नगरसेवकास स्थानिक रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, तिथल्या डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी छपरा येथून पटना येथील रुग्णालयात न्यावे असे सूचवले. 
आरोपी आणि पीडित लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये

सदर घटनेनंतर पोलिसांनी कथित डॉ. अभिलाषा हिस ताब्यात घेतले असून तिची चौकशी सुरु आहे. चौकशीदरम्यान महिलेने सांगितले की, पीडित नगरसेवक वेदप्रकाश सिंह आणि ती, दोघे मिळून पाठिमागील दोन वर्षांपासून पती-पत्नी म्हणून एकत्र राहात होते. दोघेही परस्परांशी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात होते. लग्नाचे अमिष दाखवून नगरसेवक असलेला तिचा कथीत प्रियकर पाठिमागील दोन वर्षांपासून तिचे लैंगिक शोषण करत होता. दरम्यान, तिने त्याला विवाहाबद्दल विचारले असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला, असे तिने सांगितले. 

लग्नास नकार दिल्याने गुप्तांग कापल्याचा दावा
अनेकदा विचारणा करुन आणि आश्वासनेही देऊनही जोडीदार वेदप्रकाश सिंह हा विवाहाचे नाव घेत नव्हता. त्याला आपल्यासोबत विवाह करायचाच नाही हे लक्षात आल्यानंर आपण योजना आखली आणि ती प्रत्यक्षात उतरवली. त्यासाठी तिने पीडिताला मढोरा मुख्य रस्त्यावर असलेल्या आपल्या खासगी नर्सिंग होममध्ये बोलावले आणि पुढील कृत्य केले, असेही आरोपी महिला डॉ. अभिलाषा हिने पोलिसांना सांगितल्याचे समजते.
पोलिसांकडून महिलेस अटक

दरम्यान, महिलेलने केलेल्या कृत्यानंतर गोंधळ वाढला. ज्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांना याची माहिती कळली. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांना नगरसेवक गंभीर जखमी अवस्थेत आढळून आले आणि रक्तस्त्राव झाल्याचेही पाहायला मिळाले. नागरिकांनी त्याला तातडीने मधुरा येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले आणि नंतर पुढील वैद्यकीय सेवेसाठी छप्रा येथील रुग्णालयात हलवण्यात आले.

एक्स पोस्ट

डॉक्टर महिलेला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. तिने पोलिसांकडे, स्पष्ट केले की तिने त्यांच्या नात्यासाठी खूप त्याग केला होता आणि कौन्सिलरने तिच्याशी लग्न करण्यास वारंवार नकार दिल्याने ती उद्ध्वस्त झाली होती. या घटनेने लोकांना धक्का बसला आहे आणि नातेसंबंधातील गुंतागुंत आणि न सुटलेल्या वादांचे परिणाम याबद्दल चर्चांना उधाण आले आहे. आता डॉक्टर आणि कौन्सिलर यांच्यात नेमके काय झाले हे समजून घेण्यासाठी पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.