पॅरासिटामॉलसह 156 धोकादायक 'मेडिसिन'वर बंदी; तुम्ही वापरत असलेल्या आणखी कोणत्या औषधांचा समावेश?
ताप, सर्दी, ऍलर्जी आणि वेदनांसाठी वापरल्या जाणाऱ्या 156 फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन (FDC) औषधांवर सरकारने बंदी घातली आहे. आता ही औषधे बाजारात विकली जाणार नाहीत. ही औषधे आरोग्यासाठी घातक ठरू शकतात, असे सरकारने म्हटले आहे.
FDC ही अशी औषधे आहेत जी दोन किंवा अधिक औषधे निश्चित प्रमाणात मिसळून तयार केली जातात. सध्या अशा औषधांचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यांना कॉकटेल औषधे देखील म्हणतात.
पॅरासिटामॉलवर बंदी
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 12 ऑगस्ट रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, सरकारने Aceclofenac 50 mg + Paracetamol 125 mg टॅब्लेटवर औषधे म्हणून वापरण्यास बंदी घातली आहे.FDC धोकादायक
बंदी घातलेल्या FDCs मध्ये मेफेनॅमिक ॲसिड+पॅरासिटामोल इंजेक्शन, सेटीरिझिन एचसीएल+पॅरासिटामोल+फेनिलेफ्रीन एचसीएल, लेव्होसेटिरिझिन+फेनिलेफ्रिन एचसीएल+पॅरासिटामोल, पॅरासिटामोल + क्लोरफेनिरामाइन मॅलेट + फेनिल प्रोपेनोलामाइन आणि कॅमिलोफिन डायहाइड्रोक्लोराइड 25 mg3 + यांचा समावेश आहे.
पॅरासिटामॉल, ट्रामाडोल, टारिन आणि कॅफिनच्या मिश्रणावरही केंद्र सरकारने बंदी घातली आहे. ट्रामाडोल हे वेदना कमी करणारे औषध आहे.
अधिसूचनेनुसार, आरोग्य मंत्रालयाला असे आढळून आले की FDC औषधांचा वापर आरोग्यासाठी घातक ठरू शकतो. सुरक्षित पर्याय उपलब्ध असताना. केंद्राने नेमलेल्या तज्ज्ञ समितीने या प्रकरणाची चौकशी केली होती.
औषध तांत्रिक सल्लागार मंडळाने (DTAB) देखील या FDC चे परीक्षण केले आणि शिफारस केली की या FDC चे कोणताही उपयोग नाही.
दरम्यान एफडीसी औषधांकडून धोका असू शकतो, असे नोटिफिकेशनमध्ये म्हटले आहे. त्यामुळे सार्वजनिक हितासाठी या एफडीसीचे उत्पादन, विक्री किंवा वितरण यावर बंदी घालणे आवश्यक आहे. या यादीमध्ये अशा काही औषधांचा समावेश आहे ज्या आधीच अनेक औषध उत्पादकांनी बंद केल्या आहेत.
गेल्या वर्षी जूनमध्येही १४ एफडीसींवर बंदी घालण्यात आली होती. सरकारने 2016 मध्ये 344 FDC चे उत्पादन, विक्री आणि वितरणावर बंदी घालण्याची घोषणा केली होती. या निर्णयाला औषध कंपन्यांनी न्यायालयात आव्हान दिले होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.