Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नग्न फोटो पाठव, एकटीच भेटायला ये; भाजप आमदारावर 20 वर्षीय तरुणीचे गंभीर आरोप

नग्न फोटो पाठव, एकटीच भेटायला ये; भाजप आमदारावर 20 वर्षीय तरुणीचे गंभीर आरोप 

शिमला : भाजप आमदार आणि माजी विधानसभा उपाध्यक्ष राहिलेला नेता त्याच्यावर गंभीर आरोपामुळे अडचणीत आला आहे. लैंगिक छळ प्रकरणी नेत्यावर गुन्हा दाखल झाला असून २० वर्षीय तरुणीकडे नग्न छायाचित्रे पाठवण्याची आणि एकटीच भेटायला येण्याची मागणी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. हिमाचल प्रदेशातल्या चुराह विधानसभेचे भाजप आमदार हंस राज यांच्या विरोधात पीडित तरुणीने तक्रार दाखल केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

२० वर्षीय तरुणीचे वडील भाजप पदाधिकारी असून त्यांनी आमदार हंस राज यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आमदार हंसराज यांनी चॅटिंग करत मुलीकडे तिचे नग्न फोटो मागितले. तिला अश्लील मेसेजसुद्धा केल्याचं तक्रारीत म्हटलंय. तरुणी कामानिमित्ताने आमदारांना भेटली. तेव्हा ती कामाबद्दलच चर्चा करायची. दरम्यान, आमदार हंस राज हे तिला एकटीला भेटण्यासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न करत होते. तसंच हे प्रकरण समोर येताच आमदार आणि त्यांच्या समर्थकांकडून तरुणीला चॅट डिलीट करण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

चॅट आणि इतर पुरावे डिलीट करण्यासाठी तरुणीला आमदारांसह त्यांच्या समर्थकांकडून धमक्या दिल्या जात आहेत. तरुणीने म्हटलं की, माझ्या जीवाला धोका आहे आणि कुटुंबाला कोणत्याही प्रकारची हानी झाल्यास यासाठी आमदार आणि त्यांचे समर्थक जबाबदार असतील. तरुणीकडे दोन स्मार्टफोन होते. त्यापैकी एक फोन आमदाराच्या समर्थकांनी फोडला. या प्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल करून घेत गुन्हा नोंद केला आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.