Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

25 महिलांना पाठवली अश्लील ऑडिओ टेप; विकृताला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

25 महिलांना पाठवली अश्लील ऑडिओ टेप; विकृताला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
 

मुंबई पोलिसांनी एका विकृताला बेड्या ठोकल्या आहेत. मुंबईतील 25 महिलांना त्याने अश्लील ऑडिओ टेप पाठवली. याप्रकरणी निर्मल नगर पोलिस ठाण्यात आयटी ॲक्ट आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी जास्त शिकलेला नसला तरी त्याला तंत्रज्ञानाचे चांगली माहिती होती. त्यामुळे तो पोलिसांना चुकंडा देण्याचा प्रयत्न करत होता. पण पोलिसांनी अखेर त्याच्या मुसक्या आवळल्या. पोलीस आता पुढील तपास करत आहेत.

आरोपीचे पराठ्याचे दुकान 

मोहम्मद अजीज मोहम्मद निसार खान (36) असे अटक आरोपीचे नाव आहे, तो मूळचा उत्तर प्रदेशचा असून वांद्रे येथील बेहरामपाडा भागात पराठ्याचे दुकान चालवतो. वांद्रे पूर्व येथील एका 30 वर्षीय गृहिणीला 14 जून रोजी एका अनोळखी क्रमांकावरून तिच्या मोबाइल क्रमांकावर कॉल आला आणी कॉलरने अश्लील बोलण्यास सुरुवात केली.

महिलेने फोनवर त्याच्यावर आरडाओरडा केल्यावर आरोपीने तिला अश्लील ऑडिओ टेप पाठवण्यास सुरुवात केली. त्यामुळे ती घाबरली, सुरुवातीला तिने दुर्लक्ष केले, मात्र आरोपी वारंवार त्रास देत असल्याने तिने हा प्रकार पतीला सांगितला. यानंतर निर्मल नगर पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीमंत शिंदे यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला.

मोबाईल तंत्रज्ञानाची माहिती

आरोपी कमी शिकलेला असला तरी त्याला मोबाईल तंत्रज्ञानाची बरीच माहिती आहे, असे तपासात समोर आले आहे. त्यामुळे त्याला पकडणे कठीण झाले होते. तंत्रज्ञानाच्या मदतीने पोलिसांनी आरोपी खानला बेहरामपाडा परिसरातून शुक्रवारी अटक केली, यावेळी आरोपीकडून दोन मोबाईल जप्त करण्यात आले. आरोपीच्या मोबाईलच्या तपासात तो मुंबईतील 25 महिलांना अशा प्रकारे त्रास देत असल्याचे समोर आले आहे.

आरोपी विवाहित असून त्याला दोन मुले आहेत. मुंबईतील बेहरामपाडा परिसरात किरायाने घेतलेल्या घरात तो मित्रासोबत राहतो. आरोपीने गुन्ह्यासाठी आठ विविध मोबाईलचा वापर केल्याचे तपासात समोर झाले. पोलिसांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने शुक्रवारी सापळा रचून त्याला बेहरामपाडा परिसरातून अटक केली. त्यावेळी त्याच्याकडून दोन मोबाईल जप्त करण्यात आले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.