3 मुलांची आई असलेल्या महिलेवर 2 पतींचा दावा :, पोलीसही अवाक
पाटणा : बिहारमधील वैशाली जिल्ह्यातील एका पोलीस ठाण्यात हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. इथे एका बायकोसाठी दोन नवरे भांडत होते. एक जण तो महिलेचा नवरा असल्याचं सांगत होता. तर दुसऱ्याचं म्हणणं होतं, की ती माझी पत्नी आहे. बराच वेळ हे नाटक चाललं. शेवटी महिलेनंच दोन पतींपैकी एकाची निवड केली. हे प्रकरण गौरोल पोलीस ठाण्याचं आहे.
गुरुवारी येथील पोलीस ठाण्यात दोन पुरुषांनी एकाच महिलेचा पती असल्याचा दावा केला. ही महिला तीन मुलांची आई आहे. तिला 18 आणि 20 वर्षांची दोन मुलं आणि 13 वर्षांची मुलगी आहे. दोन्ही व्यक्तींचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या प्रकरणाची उकल करण्यास सुरुवात केली. मिळालेल्या माहितीनुसार, मुझफ्फरपूर जिल्ह्यातील सकरा पोलीस स्टेशन हद्दीतील बखरी गावातील रहिवासी राम प्रसाद महतो यांचा विवाह 22 वर्षांपूर्वी साक्रा पोलीस ठाण्याच्या मझौली गावात झाला होता.
लग्नानंतर त्यांना दोन मुलं आणि एक मुलगी झाली. दरम्यान, 2018 मध्ये पती-पत्नीमध्ये वाद झाला होता. पत्नी आपल्या 5 वर्षाच्या मुलीसह घर सोडून हाजीपूरला गेली आणि तिथल्या एका कंपनीत काम करू लागली. दरम्यान, ही महिला कुधणी पोलीस स्टेशन हद्दीतील ढोढ़ी गावात राहणाऱ्या बथू राय यांच्या पत्नीला भेटली. ती तिच्यासोबत ढोढ़ी येथे आली आणि काही दिवसांनी ती जवळच्या गोरौल पोलीस स्टेशनच्या चैनपूर भटौलिया गावातील रहिवासी हरेंद्र राय याच्यासोबत राहू लागली.महिलेचा पहिला पती राम प्रसाद याने पोलिसांना सांगितलं की, तो सात वर्षांपासून सतत पत्नीचा शोध घेत होता. ती भटौलिया गावात राहत असल्याची माहिती गेल्या मंगळवारी त्याला मिळाली. याबाबत पोलिसांना माहिती देऊन महिला आणि तिच्या पतीला पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. दोन्ही पतींनी महिलेला सोबत नेण्यास होकार दिला. मात्र, महिलेनं आपल्या पहिल्या पतीसोबतच जाण्याचा हट्ट धरला. यानंतर तिला तिच्या पहिल्या पतीसोबत पाठवण्यात आलं.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.