Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ग्रामीण विकास निधी मधून सांगली मतदारसंघातील ग्रामीण भागासाठी 6 कोटींची विकासकामे मंजूर..आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या पाठपुराव्याला यश ; ग्रामीण विकास मंत्रालयाचा अध्यादेश

ग्रामीण विकास निधी मधून सांगली मतदारसंघातील ग्रामीण भागासाठी 6 कोटींची विकासकामे मंजूर.. आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या पाठपुराव्याला यश ;  ग्रामीण विकास मंत्रालयाचा अध्यादेश
 

सांगली दि.10 ऑगस्ट :- सांगली विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील गावांसाठी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या मागणीनुसार 6  कोटी रुपये खर्चाची कामे मंजूर करण्यात आली आहेत. ग्रामविकास मंत्रालयाने त्या संदर्भात अध्यादेश जारी केला आहे. मतदार संघातील हरिपूर ,बुधगाव, बिसूर ,पदमाळे, नांद्रे, वाजेगाव, कावजी खोतवाडी, कर्नाळ, इनाम धामणी आणि अंकली या गावात रस्ते ,गटारी आणि सभागृह बांधकाम आदी स्वरूपाची कामे केली जाणार आहेत. या कामासंदर्भातील कार्यवाही तातडीने सुरू करण्यात येणार आहे.

आमदार गाडगीळ यांनी सांगली विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागामध्ये नागरी सुविधांसाठी राज्य शासनाकडे निधीची मागणी केली होती. त्यानुसार  ग्रामीण विकास व पंचायत राज मंत्रालयाने २५-१५  योजनेअंतर्गत विविध विकास कामे मंजूर केली आहेत. यासाठी 6 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. ग्रामीण भागात नागरी सुविधांसाठी निधी मंजूर झाल्यामुळे ग्रामस्थातून समाधान व्यक्त होत आहे..

हरिपूर येथील  वार्ड नं  3 कारंडे कॉलनी येथील गणपती कारंडे घर ते  गोरे घर  ते दावीद तिवडे घर रस्ता  विकसीत  करणे, वार्ड नं ६ गणपती मंदिर समोरील मोरया हॉल  परिसरातील अंतर्गत रस्ते  विकसीत करणे, वार्ड नं ६ संगमेश्वर कॉलनी येथील पोतदार यांच्या घरासमोरील रस्ते  विकसीत करणे. वार्ड नं ६ निळकंठ नगर यशवंत शिंदे घर ते धर्माधिकारी घरापर्यंत रस्ता विकसित करणे वार्ड नं ६ शिवपार्वती मंगल कार्यालय  ते शंकर मोहिते  ते  काळी वाट संगम हॉटेल पर्यंत रस्ता  विकसीत करणे. वार्ड नं ६ धर्मवीर नगर मधील श्री. कृष्ण मंदिरा समोरील रस्ता विकसीत करणे.  1 कोटी 47 लाख रुपये, बुधगाव  येथील  शेख घर ते विजय चव्हाण घरापर्यंत रस्ता  विकसीत करणे. प्रमोद जाधव घर ते चक्कर सडक रस्ता  विकसीत करणे. वार्ड नं २ विजय चव्हाण घर ते उषा मोरे घर बंदिस्त गटर करणे.
सागंली - तासगांव रोड पासुन राजवाडयापर्यंत रस्ता सुधारणा करणे. व  रस्त्याच्या दोन्ही बाजूस पेव्हींग ब्लॉक बसवणे. ओंकार कॉलनी अंतर्गत रस्ते  विकसीत करणे. वटसावित्री चौक ते कोरवी घरापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूस पेव्हींग ब्लॉक बसवणे. 1 कोटी 14 लाख रुपये, खोतवाडी येथील मुरलीधर माने ते पांडुरंग खामकर घर रस्ता  विकसीत करणे. दुर्गामाता मंदिर ते रमेश माने घरापर्यंत दोन्ही बाजूस गटर व रस्ता  विकसीत करणे. 26 लाख रुपये, वाजेगाव येथील नंदीवाले वसाहत रस्ता व गटर करणे.  वाजुबाई मंदिर ते नांद्रे रस्त्यापर्यंत रस्ता विकसीत   करणे. 30 लाख रुपये, कर्नाळ येथील कर्नाळ ते जुना नांद्रे रस्ता विकसीत करणे. ग्रा.प. मिळकत नं १३३७ येथे सभागृह बांधणे पद्माळ वाट मेन रोड ते बाळकृष्ण देशपांडे ते आनिल पाटील शेत रस्ता  विकसीत करणे. हवालदार शिंदे बोळ (भाऊ माने घर ते शंकर शिंदे घर) रस्ता पेव्हींग ब्लॅाक बसवणे. 67 लाख रुपये, पद्माळे येथील  सांस्कृतिक भवन ते नदी घाटापर्यंत जाणारा रस्ता 
कॉंक्रीटकरण करणे. 

16 लाख रुपये, माधवनगर येथील वार्ड क्र ६ मधील बार्शीकर कारखाना ते रविवार पेठ मुख्य चौक (पूर्व भाग), राजेंद्र पाटील घर (चड्डा गोडाऊन) ते परिधान कलेक्शन सोमवार पेठ येथे रस्ता विकसीत करणे. वार्ड नं. ६ लुक्कड घर से बेदमुथा घर गटर करणे. 33 लाख रुपये, नांद्रे येथील जैन मंदिर ग्रा.प. मिळकत नं १ येथे सभागृह बांधणे. माजी सैनिक कल्याण संस्थेस संरक्षित भिंत बांधणे. नावरसवाडी  येथील श्री. विठ्ठल मंदिर ते संभाजी यादव घरापर्यंत गटर करणे. 52 लाख रुपये, अंकली येथील कुंभार सांस्कृतिक भवन ते NH 166 पर्यंत रस्ता व अंडरग्राउंड गटर करणे. 52 लाख रुपये, इनामधामणी येथील वंदना कांबळे घर ते जुना लक्ष्मी मंदिर रस्ता  विकसीत  करणे.  गजानन सूर्यवंशी घर ते सुनील उगार घर भुयारी गटर करणे.  महादेव ढवळेश्वर ते महादेव शिंदे घरापर्यंत रस्ता  विकसीत करणे.  32 लाख रुपये असे एकूण 6 कोटी मंजूर करण्यात आले..

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.