'या' तारखेपासून लागू होणार नवीन 8 वा वेतन आयोग !
आठवा वेतन आयोगाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी अपडेट समोर येत आहे. खरे तर, लोकसभा निवडणुकीआधी आठवा वेतन आयोग लागू होणार असा दावा केला जात होता. नंतर, निवडणुकीनंतर सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात आठवा वेतन आयोगाची घोषणा होणार असे म्हटले जात होते.
मात्र केंद्रातील सरकारने अर्थसंकल्पात याबाबतची घोषणा केली नाही. याउलट मोदी सरकारने सध्या स्थितीला सरकार दरबारी नवीन वेतन आयोगाबाबतचा कोणताच प्रस्ताव विचाराधीन नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. आता मात्र याचं नवीन वेतन आयोगाबाबत नवीन अपडेट समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट नुसार आठवा वेतन आयोग त्याच्या नियोजित वेळेत लागू केला जाणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की सध्याचा सातवा वेतन आयोग हा 2016 मध्ये लागू झाला.
एक जानेवारी 2016 पासून सातवा वेतन आयोग लागू झाला असून यासाठीच्या समितीची स्थापना 2014 मध्ये करण्यात आली होती. आतापर्यंतचा वेतन आयोगाचा ट्रेंड पाहिला असता प्रत्येक दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू होत असतो.
पहिला वेतन आयोग 1947 मध्ये लागू झाला आणि त्यानंतर दर दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू होत आला आहे. यानुसार नवीन आठवा वेतन आयोग 1 जानेवारी 2026 पासून लागू होणे अपेक्षित आहे. मात्र यासाठीच्या समितीची स्थापना किमान एक वर्ष आधीच होणे जरुरीचे आहे.यामुळे कर्मचाऱ्यांच्या संघटनांच्या माध्यमातून सातत्याने शासनाकडे आठवा वेतन आयोगा संदर्भात पाठपुरावा केला जात आहे. पण, सरकार सातत्याने सध्या तरी आठवा वेतन आयोग संदर्भात कोणताच प्रस्ताव विचाराधीन नसल्याचे म्हणतं आहे. यामुळे सरकारी कर्मचारी संभ्रमात आहेत.
पण आता मीडिया रिपोर्ट्स मध्ये आठवा वेतन आयोगासंदर्भात सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनांसोबत चर्चा सुरू केली असल्याचा दावा केला जात आहे. यामुळे आठवा वेतन आयोग नियोजित वेळेत म्हणजेच एक जानेवारी 2026 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागू केला जाऊ शकतो अशी आशा आहे.
नवीन वेतन आयोगामुळे पगारात किती वाढ होणार
मिळालेल्या माहितीनुसार, नवीन आठवा वेतन आयोगामुळे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या किमान मूळ पगारात आठ हजाराची म्हणजेच किमान मूळ पगार 18,000 वरून 26,000 होणार आहे. तसेच, महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा किमान मूळ पगार सहा हजारांनी वाढणार असून हा किमान मूळ पगार 15,000 वरून 21 हजारावर पोहोचणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.