कासेगाव (ता. वाळवा) येथे अज्ञातांनी गोळ्या झाडून पांडुरंग भगवान शीद (वय ४०) याचा खून केला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली.
मृत पांडुरंग शीद यांची शेत जमीन व शेतवस्ती वाटेगाव शिव लगत आहे. आज, शुक्रवारी सकाळी ७ च्या दरम्यान ते त्या ठिकाणी गेले होते. दरम्यान अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. यावेळी त्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी अज्ञातांनी त्यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या. यामध्ये एक गोळी त्यांच्या डोक्यात लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. कासेगाव पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस अधिक तपास करीत आहेत. मृत पांडुरंग शीद यांच्या पश्यात आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.