Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भारतात या कोपऱ्यात सापडलं हिरवं सोनं, देशाचं नशीब पालटणार!

भारतात या कोपऱ्यात सापडलं हिरवं सोनं, देशाचं नशीब पालटणार!
 

बारा: पृथ्वीच्या पोटात काय काय दडलंय याचा अभ्यास कायम सुरू असतो. त्यातलीच एक म्हणजे खनिजं...भारतात खनिजांचे अनेक साठे आहेत. वेळोवेळी, उत्खननादरम्यान, या खनिजांचे साठे सापडतात. राजस्थानातही कधी सोन्याची खाण सापडते तर कधी इतर मौल्यवान खनिजांचा खजिना सापडतो.

याच राजस्थानातल्या बारा जिल्ह्यांमध्ये दुर्मिळ खनिजांचा साठा सापडला आहे. त्यामुळे भारताचे इतर देशांवरील अवलंबित्व 95 टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे. या लपलेल्या खनिजांचा शोध घेण्यासाठी राज्यात 'रेअर अर्थ एलिमेंट एक्सलन्स सेंटर' स्थापन करण्याची योजना आखली जाते आहे. या केंद्राच्या माध्यमातून राज्यातील खनिजांचा शोध घेतला जाणार आहे. यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.

खनिजांविषयी अधिक माहिती मिळाली की, त्याचा वापर संबंधित उत्पादनांसाठीही केला जाणार आहे. त्यामुळे उद्योगांनाही चालना मिळेल. या केंद्राच्या स्थापनेसाठी खाण खात्यातील संशोधक, कर्मचारी देशातील अनेक संस्था आणि तज्ज्ञांशी चर्चा करत आहेत.

अनेक तज्ज्ञांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संभाषण झालं आहे,‌ अशी माहिती राजस्थानचे खनिकर्म सचिव आनंदी यांनी दिली. सध्या राजस्थानच्या बारा जिल्ह्यांमध्ये खनिजं असल्याचं समोर आलं आहे. यामध्ये बाडमेर, जालोर, सिरोही, पाली, उदयपूर, भिलवाडा, नागौर, अजमेर, जयपूरचे नीमकथाना, राजसमंद, सीकर आणि बांसवाडा यांचा समावेश आहे.

कार्बोनेटाइट्स आणि मायक्रोग्रॅनाइट खडकांमध्ये बस्तानासाइट, ब्रिटोलाइट, सिंकाइसाइट आणि झेनोटाइम अशा पृथ्वीतल्या दुर्मिळ घटकांचे साठे आढळले आहेत. या पुढच्या संशोधनात खनिजं सापडली, तर त्यात वापरल्या जाणाऱ्या वस्तू तयार करण्यासाठी कारखानाही उभारला जाईल. त्यामुळे उद्योगधंद्यांना चालना मिळेल आणि रोजगारही वाढेल. बॅटरी, लेझर बॅटरी अशा उत्पादनांची निर्मिती या खनिजांपासून केली जाणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, या खनिजांमुळे आपल्या देशाचं या क्षेत्रातलं चीनवरील अवलंबित्व ९५ टक्क्यांनी कमी होईल, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. यासोबतच देशात कच्च्या मालावर प्रक्रियाही सुरू होणार आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.